Sudhir Mungantiwar On INDIA :  Sarkarnama
मुंबई

Sudhir Mungantiwar On INDIA : मोदींच्या नरडीचा घोट घेणाऱ्यांचीच तिरडी वर जाईल; मुनगंटीवार 'इंडिया'वर गरजले..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : भारतीय जनता पक्ष विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक आज पार पडत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून या आघाडीवर जोरदार टीका केली जात आहे. भाजप नते व राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इंडिया आघाडीवर आसूड ओढून, आता तपास यंत्रणांच्या चौकशी लागली तर रडायचं नाही, असा सूचक दम दिला आहे. (Latest Marathi News)

मुनगंटीवारपुढे म्हणाले, "इंडिया ची मुंबईतील बैठक म्हणजे गम्मत आहे. नुसता दिखावा आहे. यांचा एकच मिनिमम कॉमन प्रोग्रॅम आहे. ते म्हणजे मोदींना हटवणं. यांचे नेते आरजेडी प्रमुख लालू यादव म्हणतात, मला मोदींच्या नरडीवर बसायचं आहे. मात्र ही मुंबई आहे, इथून तुमची तिरडी वर जातील," असा दम त्यांनी दिला.

दुष्काळावर भाष्य -

"दुष्काळावर उपाययोजना करताना सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. नवीन कायदा आणला आहे. त्यानुसार ३० दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची आहे. नाही दिली तर त्यावर व्याज द्यायचे आहे. देशात शेतकऱ्यांना सर्वात जास्त नुकसान भरपाई आपल्या राज्यात दिली जाते. कुंपणाचा कायदा आणत आहोत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना मदत झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी आग्रही आहेत. नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील नियम वनविभागाने बदलवायचे आहेत," असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT