INDIA Mumbai Meet : भाजपविरोधात एकवटलेल्या 'इंडिया' बैठकीच्या सप्ततारांकित हॉटेलात शेतकरी नांगर घेऊन घुसणार..

Farmers At seven-star hotel in India Meeting : "राजस्थानातील शंभर शेतकरी हे पायी चालत मुंबईत आले आहेत."
INDIA Mumbai Meet
INDIA Mumbai Meet Sarkarnama

Mumbai News : केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधातील इंडिया आघाडीची बैठक आज आणि उद्या मुंबईत होत आहे. देशभरातील २८ प्रमुख विरोधी राजकीय पक्षांचे ६७ नेते हे त्यासाठी कालच मुंबईत दाखल झाले आहेत.त्यांचे लक्ष शेतमालाला किमान हमीभाव द्यावा आणि त्यासाठी कायदा करावा, या आपल्या मुख्य मागणीकडे वेधण्यासाठी किसान महापंचायतचे राजस्थानातील शंभर शेतकरी हे पायी चालत मुंबईत आले आहेत. (Latest Marathi News)

INDIA Mumbai Meet
Rahul Gandhi For PM : 'इंडिया'चा पहिला बॅट्समॅन ठरला; राहुल गांधी असणार पंतप्रधानपदाचे उमेदवार ?

इंडिया आघाडीची बैठक होत असलेल्या वाकोला परिसरातील ग्रँड हयात या सप्ततारांकित हॉटेलच्या आवारात हातात नांगर घेतलेले हे शेतकरी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव (एमएसपी) द्यावा, त्यासाठी केंद्र सरकारने कायदा करण्यासाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने दखल घ्यावी, त्यांनी केंद्रावर दबाव आणावा, हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडावे, यासाठी आठ दिवसांपासून चालत हे शेतकरी राजस्थानहून मुंबईत आले आहेत. आपल्या मागण्या लवकर मान्य कराव्यात, अशी किसान महापंचायतची मागणी आहे.

INDIA Mumbai Meet
INDIA Mumbai Meet : खर्गेंच्या विश्वासू खासदाराने ठाकरे गटातील नेत्यांसोबत केली पाहणी ; खासदार सावंत, नार्वेकर गुंतले तयारीत..

विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीला आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन किसान पंचायतचे हे शेतकरी पुन्हा आज राजस्थानला माघारी फिरणार आहेत. दरम्यान, त्यांचा हा ज्वलंत प्रश्न इंडिया आघाडी कसा धसास लावते, त्यासाठी काय नेमका पाठपुरावा करते आणि केंद्र त्याची निवडणुकीच्या तोंडावर दखल घेणार का? याकडे राजस्थानच नाही, तर महाराष्ट्रासह देशभरातील बळीराजाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com