Mumbai, 10 July : जनसुरक्षा विधेयकावर बोलताना भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली. मुख्यमंत्री महोदय, चंद्रपूर, गडचिरोलीची जनता, कर्मचाऱ्यांनी नक्षलवाद कमी करण्यासाठी प्रयत्न केले. आपण एक जीआर काढून त्यांचा भत्ताच बंद करून टाकला. मन मोठं करा. नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढंच विशाल असलं पाहिजे. यानिमित्ताने ही संधी मी तुम्हाला देतोय, तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका. पण तो भत्ता सुरू करण्याची संधी देतोय. तुम्ही मात्र ते भत्ता सुरू करावा, एवढी विनंती करतो, असे म्हणत मंत्रिमंडळातून वगळल्याची खंत सुधीरभाऊंनी पुन्हा बोलून अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.
मुनगंटीवारम्हणाले, जनसुरक्षा विधेयक आणल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन करतो. कारण नक्षलवाद आम्ही अनुभवला आहे. गडचिरोली आणि चंदपूरने नलक्षवाद अनुभवला आहे. खरं तर मला या बिलावर बोलायचं नव्हतं. पण, या बिलावर कारण नसताना शंका, संदिग्धता आणि भीती, सामान्या लोकांमध्ये एक विचित्र नेटिव्ह पसरविण्याचे काम या सभागृहातून होऊ नये.
ज्यांनी लहानपणी पारस चित्रपट पाहिला, त्यातील एका पात्राच्या कल्पनेप्रमाणे पेटलेली काडी खाली पडून कारपेट पेटेल, घर, गाव, राज्य आणि देश पेटेल, असा तो कल्पना करत असतो. ही कल्पकता या बिलावर आपण आणणार आहोत का. आम्ही ३३ कोटी देव मानतो. सामान्य जनांच्या रक्षणासाठी धावा केला पाहिजे. हे बिल नंबर ३३, जनसुरक्षा विधेयक हे सामन्य जनांसाठीच आलेले आहे, असा दावा सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी केला.
ते म्हणाले, विधानसभेतील सदस्यांना माझं आवाहन की, एकदा गडचिरोलीला येऊन बघा. त्या विधवा बहिणींना येऊन भेटा, तिचा काय दोष आहे. तेथील युवकांचा काय दोष आहे. हात, पाय कापले. इतक स्पष्ट विधेयक आणण्यामागचं कारण आहे. त्यामुळे खूप काही मराठी वाचायची सुद्धा गरज नाही. ज्यांनी चौथ्या वर्गाची मराठी वाचली आहे ना. स्पष्ट आहे की, नक्षलवादाचा धेाक केवळ नक्षलग्रस्त राज्यांचा. सरकारचं अभिनंदन नाही केलं, तर मी समजू शकतो. आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होतील म्हणून केलं नाही, ते मी समजून घेऊ शकतो. पण सूचना करताना त्यामध्ये लू फॉल ठेवायचे, अशा सूचना करायच्या.
जाधवसाहेब तुम्ही तर विधेयकाबद्दल सरकारचे अभिनंदन केले आहे. आम्ही तर ही नीतीच अवलंबली आहे की, आपल्या विरोधी पक्षाचंही मन आपल्यामध्ये घेऊन कसं जिंकता येतं. त्यामुळे बानकुळे यांची एक चूक झाली आहे की, जे बोलणारे होते, त्यांनाही समितीत घ्यायला पाहिजे होतं. विचारसरणी शस्त्र म्हणून वापरणे डेंजरच आहे. शस्त्र वापरलं काही लोकांची जीवितहानी होते. पण या विचारसरणीने.... अफजल तेरे कातिल जिंदा है... हम बहुत शरमिंंदा है.. ही कोणाची विचारसरणी आहे. अशा विचारधारेला सुईने टोचून मारले पाहिजे, असा इशाराही दिला.
इथं कुठं शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या मोर्चाचा विषय आहे. तुम्ही भीती अशी दाखवता की शंका येते, तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या वंशांचा वारसा चालविता की नाही. कवी भूषण यांनी काय म्हटलं होतं. हाती घोडे तोफ तलावरे, फौज तो तेरी सारी है. जंजीर में जखडा राजा मेरा आजभी तुझपे भारी है. अरे काय तुम्ही कायद्याला घाबरता. तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का, असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला.
ते म्हणाले, गडचिरोलीचा नक्षलवाद आपण जी ६० केलं, तसं त्यांनी रुप बदललं. जसा रावण आणि राक्षस रूप बदलून यायचे, तसं या नक्षलवाद्यांनीही आपलं रुप बदललं. आता टेकड्या सोडून विद्यापीठाच्या ग्रंथालयात बसायला लागले. कम्युनिस्ट पक्षाचा आमदाराने चिंता करू नये, आम्ही तुमच्यासोबत आहोत, त्यामुळे तुम्ही चिंता करू नये.
छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे ७६ लोकं नक्षलवादी हल्ल्यात मारले गेले. आपली विचारधारा वेगळी असू शकते आणि वैचारिक मतभेद असू शकतात. पण शंका, कुशंका उपस्थित केल्यानंतर गडचिरोली काय संदेश जाईल. विदर्भाने हा नक्षलवाद अनुभवला आहे, त्यामुळे हे जनसुरक्षा विधेयक एकमताने मंजूर करावं, असे आवाहन त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.