Jayant Patil : जयंतराव प्रचंड संतापले; अशी विधानासभा 38 वर्षांत पाहिली नाही...लोकशाहीचा चुतडा करायचं काम सुरूंय’

Assembly Monsoon Session : मी या सभागृहात तब्बल 38 वर्षे काम करीत आहे. एवढा सावळा गोंधळ आणि काम रेटायची पद्धत आणि रेकॉर्डला दाखवणं, यातून आपल्याला काय मिळतं. लक्षवेधी सूचनेला सरळ उत्तर येत नाहीत.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 10 July : विधानसभेच्या कार्यक्रमपत्रिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील प्रचंड भडकले. अशी विधानसभा 38 वर्षांत मी कधीही पाहिली नाही. लोकशाहीचा चुतडा करायचं काम सध्या जर होत असेल तर सभागृहात येणंच आवश्यक नाही, असं सध्या वाटायला लागलं आहे, अशी उद्‌विग्न भावना व्यक्त करत सरकारचे वाभाडे काढले.

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, विधानसभेत अशासकीय विद्येयकांवर चर्चा केल्याचे आम्हाला कधी आठवत नाही. सुधीर मुनगंटीवार यांच्या आज चार चर्चा दाखवल्या आहेत. म्हणजे कार्यक्रमात दाखवयाच्या आणि पुढे ढकलायच्या, असं काम सध्या चाललं आहे. मुनगंटीवरांची चार विधेयके आहेत. त्याला दिवसभरात न्याय कधी देणार? ऑर्डर ऑफ डे तब्बल 20 पानांचा आहे.

आठ अर्धा तास चर्चा...अशासकीय विधेयके चार म्हणजे मला कळतं नाही... मी या सभागृहात तब्बल 38 वर्षे काम करीत आहे. एवढा सावळा गोंधळ आणि काम रेटायची पद्धत आणि रेकॉर्डला दाखवणं, यातून आपल्याला काय मिळतं. लक्षवेधी सूचनेला सरळ उत्तर येत नाहीत. लक्षवेधी सूचनेला बऱ्याचदा मंत्री हजर नसतात. मग त्या लक्षवेधी सूचना दुपारच्या वेळी घेतल्या जातात, असेही पाटील यांनी नमूद केले.

ते म्हणाले, विधानसभेच्या अशासकीय प्रस्तावांना काही तरी न्याय मिळावा. खरं तर आता चंद्रदीप नरके जो अहवाल मांडतात. ते मनापासून बोलतात की कोणी तरी लिहून दिलेला वाचतात. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) सध्या नाहीत, सत्तारुढ पक्षापेक्षा विरोधी पक्षांनी मांडलेल्या सूचना हे वेगळं कामकाज आहे. लक्षवेधी सूचना किती मांडाव्यात. लक्षवेधी सूचना तीन ते चार पेक्षा जास्त नसाव्यात. पहिले तीन दिवस हे सूत्र पाळलं गेलं आणि पुढे पाळलं गेलंच नाही. काल साडेपाच वाजता गिलोटिन होतं. त्याच्या अगोदर आम्हाला तुम्ही दोन-अडीच वाजता बोलायला संधी दिलीत. त्याच्या अगोदर तुम्ही बाकीचा बिझनेस करून घेता.

Jayant Patil
Abhijeet Patil : आमदार अभिजीत पाटील कसे ठरले सायबर फ्रॉडचे बळी? सभागृहात सांगितली आपबिती, फडणवीसांचं आश्वासन

पुरवणी मागण्यांनाही भरपूर वेळ द्यायची सरकारची तयारी नाही. अशी विधानसभा मी गेल्या 37-38 वर्षांत कधी बघितलं नव्हती. असा सगळा लोकशाहीचा चुतडा करायचं काम सध्या जर होत असेल तर सभागृहात येणंच आवश्यक नाही, असं वाटायला लागलं आहे. पण, त्यांचा अहवाल आहे, त्याला माझा विरोध आहे. माझी ही मतं आपण लक्षात घ्यावीत, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

आपल्या कामात सुधारणा कराव्यात. आज दुपारी बीएससीची मिटिंग आहे. आपल्याला वीस पानांची कार्यक्रम पत्रिका करावी लागत असेल तर पुढच्या शुक्रवारपर्यंत सभागृह चालवणं आवश्यकच आहे. जनसुरक्षा विधेयक आज तुम्ही मांडलं आहे की ते इतकी महत्वाचं आहे की त्याला ज्वाईन सिलेक्ट कमिटी आपण केलेली आहे, त्यावेळी आपण एवढा बिझनेस दाखवला म्हणजे ‘व्हॉट आर यू सिरियस अबाउट?’ म्हणजे सरकारचा काय उद्देश आह, असा सवाल जयंतरावांनी केला.

Jayant Patil
Beed Politic's : मुश्रीफांनी अंबाजोगाईला ‘छप्पर फाडके मिळणार’ म्हणताच खुद्द अजितदादांनी नमिता मुंदडांच्या मतदासंघासाठी केली मोठी घोषणा!

ते म्हणाले, आम्ही भाषणं करतो, तेव्हा मंत्री तर नसतातच. आता हा पहिला ब्लॉग सगळा मोकळा आहे. मंत्री नसतात, गॅलरीत अधिकारी नसतात. फार वाईट अवस्था आहे, पण लोकशाहीचा गाभा या विधानसभेत आहे आणि विधानसभेतील हा आत्मा मरू देऊ नका, एवढी एकच माझी आपल्याला विनंती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com