Sunetra Pawar
Sunetra Pawar Sarkarnama
मुंबई

Sunetra Pawar News : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; बारामतीला मिळाला तिसरा खासदार

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता.पण आता त्यानंतर काही दिवसांतच सुनेत्रा पवार यांच्या 'खासदारकी'मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अनेक नावं चर्चेत होती. त्यात मंत्री छगन भुजबळांनीही राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर कुणाला उमेदवारी द्यावी याबाबत अजित पवारांसमोर मोठं धर्मसंकट उभं राहिलं होतं.अखेर गुरुवारी या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सुनेत्रा पवार यांनाच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. विरोधात कोणताही उमेदवार न आल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या रूपाने बारामतीला आता तिसरा खासदार मिळाला आहे. त्यांनी मला मिळालेल्या संधीचं सोनं करेन अशी प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिली होती.

सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून काही दिवसांपूर्वीच खासदारकीची हॅट्ट्रिक केली आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा राज्यसभेवर खासदार आहेत.

राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट)सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.या जागेसाठी सुनेत्रा पवार यांच्यासह बाबा सिद्दीकी,समीर भुजबळ,छगन भुजबळ आणि नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा होती.पण अखेर सुनेत्रा पवारांच्या नावावर अजित पवार गटाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.

बारामती मधील काटेवाडीतून देखील राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार Sunetra Pawar वहिनींना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली होती. तर, पुणे शहरध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी ठराव केला होता. तसे पत्र देखील त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते.

दरम्यान, विधानभवनामध्ये सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT