Chhagan Bhujbal : लोकसभेपाठोपाठ भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता कट; म्हणाले, 'नाराजी दिसते का? प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होतं नाही'

Chhagan Bhujbal Commentary On Sunetra Pawar Rajya Sabha Candidature : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव राज्यसभेसाठी पक्षाकडून समोर आले आहे. राज्यसभेसाठी पक्षात 13 जण इच्छुक होते. त्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव देखील येत होते.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभेसाठी इच्छुक असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

'मी नाराज नाही. पक्षामध्ये सर्वांना घेऊन चालावे लागते. चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात. हे आज नाही, 57 वर्षांपासून शिकतोय. पक्षात काम करताना प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते असे नाही', असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव राज्यसभेसाठी पक्षाकडून समोर आले आहे. राज्यसभेसाठी पक्षात 13 जण इच्छुक होते.

त्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव देखील येत होते. मात्र सुनेत्रा पवार यांचे नाव पक्षातून समोर आल्यानंतर आणि पक्षाने डावलल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगण्यात आले. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत नाराज वैगेरे नाही, असे म्हटले आहे.

छगन भुजबळ (NCP) म्हणाले, "सुनेत्रा पवार यांचा निर्णय मंत्रिमंडळातील कोअर ग्रुपमधील नेत्यांनी घेतला आहे. अजिदादांनी कुठे काय म्हटले देखील नाही. मंत्रिमंडळातील कोअर ग्रुपमधील नेत्यांनी ठरवले आहे. अजितदादांना बोलण्याचा काहीच अर्थ नाही. हा निर्णय आमचा सर्वांचा आहे".

हा निर्णय सर्वानुमते असल्याने नाराज वैगेरे काही नाही. माझ्या तोंडावर तसे दिसणार सुद्धा नाही. पक्षामध्ये सर्वांना घेऊन चालावे लागते. चर्चा करून निर्णय घ्यावे लागतात. हे आज नाही, 57 वर्षांपासून शिकतोय.

शिवसेना, शरद पवार साहेबांबरोबर आणि काँग्रेसमध्ये असेच निर्णय होतात. सुनेत्रा पवार यांचा निर्णय देखील असाच झाला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते, असे नाही, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Politics: भुजबळांना का लागलेत दिल्लीच्या राजकारणाचे वेध?

पराभूत उमेदवार सुनेत्रा पवार यांना मध्येच एन्ट्री दिल्याने पक्षात नाराजी आहे. 13 जण इच्छुक होते. यावर छगन भुजबळ म्हणाले, "13 जणांना उमेदवारांना निवडणुकीला उभे करता येईल का? कोणाला तरी, एकालाच उभा करता येईल".

पराभूत उमेदवाराला पुन्हा बॅक दरवाज्याने संधी यावर छगन भुजबळ यांनी पक्षाचा निर्णय आहे, तो सर्वांनाच मान्य करावा लागतो, असे ठासून सांगितले. मी अपक्ष नाही. मी पक्षात आहे. पक्षाच्या काही गोष्टी अनिवार्य असतात, त्या मान्य कराव्याच लागतात.

Chhagan Bhujbal
Nashik Teachers constituency Election 2024 : उमेदवार कोट्यधीश; मतदार अन् शिक्षक उपाशी!

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार पक्षाला खासगी मालमत्ता समजतात. ज्येष्ठ असून तुम्हा निर्णय प्रक्रियेत डावलले जाते. यावर भुजबळ म्हणाले, "काल मला बोलवले होते. बैठकीत होतो. मग कुठे डावलले मला". उमेदवारीला वेळ कशाला हवा.

आम्ही सर्व आमदाराच मतदान करणार आहोत. महायुतीचे आमदार फार मोठ्या प्रमाणात आहेत. सहज निवडून येतील. विरोधी पक्षाकडून कोणी अर्ज भरेल, असे वाटत नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com