Vishakha Raut Eknath Shinde Uddhav Thackeray.jpg Sarkarnama
मुंबई

Thackeray vs Shinde : विशाखा राऊतांचे नगरसेवकपद कायम राहणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?

Vishakha Raut Supreme Court Stays Decision : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. विशाखा राऊत यांचे नगरसेवक रद्द करण्याच्या निर्णय न्यायालयाने स्थगित केला आहे.

Roshan More

Vishakha Raut News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुप्रीम कोर्टात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 191 मधील नगरसेविका, माजी महापौर विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपद रद्द करण्याच्या निर्णयाला कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रिया सरवणकर यांची नगरसेवक म्हणून नियुक्तीचा मार्ग तूर्तास बंद झाला आहे.

विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, तेव्हा हायकोर्टाने निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे राऊत यांचे नगरसेवकपद रद्द होऊन त्या जागी त्यांच्या विरोधात लढलेल्या प्रिया सरवणकर यांना नगरसेवकपद मिळणार असल्याचे निश्चित मानले जात होते. मुंबई महापालिका प्रशासनाने देखील नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस केली होती.

दरम्यान, राऊत यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे आता जात प्रमाणपत्रावरील अपिलाचा निर्णय झाल्यानंतर राऊत अपात्र आहेत की नाही हे ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

विशाखा राऊत या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 191 मधून विजयी झाल्या होत्या. त्यांनी प्रिया सरवणकर यांचा पराभव केला होता. ही जागा ओबीसीसाठी राखीव होती. मात्र, पालघर जात पडताळणी समितीने विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी राऊत यांना अपात्र ठरवण्यासाठी राज्य सरकारकडे शिफारस केली होती. त्यानंतर राऊत यांना अपात्र ठरवण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT