Uddhav Thackeray Setback : ज्याची भीती तेच घडलं! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या मंत्रालयाने अधिसूचना काढली

Eknath Shinde Vishakha Raut BMC : एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द केल्या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगरसेवकांची संख्या घटणार आहे. माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द होणार आहे.

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. दरम्यान, शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागाने राऊत यांचे नगरसेवकपद रद्द केल्या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

सोमवारी (ता.7) महापालिकेची सभा होणार आहे. या सभेत राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अनुभवी नगरसेविका महापालिकेत नसणे हा देखील ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

पालघर जात पडताळणी समितीने राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारशी पत्रव्यवहार करत राऊत यांचे नगरसेवक रद्द करण्याससंदर्भात हालचाली सुरू केल्या होत्या, त्यामुळे राऊत यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, त्यांना तेथे देखील दिलासा मिळाला नव्हता.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Shivsena News : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, नगराध्यक्षांसह अख्खी नगरपंचायतच एकनाथ शिंदेंच्या गळाला!

ऑपरेशन टायगर अ‍ॅक्टिव्ह

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही नेत्या फोडण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे असल्याची चर्चा आहे. त्यातच रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी ऑपरेशन टायगर अॅक्टिव्ह असल्याचे म्हटले आहे. तर, आम्ही ठाकरेंचा मोठा नेता फोडणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Vishakha Raut : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विशाखा राऊत अडचणीत; नगरसेवकपदावर टांगती तलवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com