Uddhav Thackeray-Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Supreme Court News: राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होणार ? आज सुनावणी

Maharashtra MLC Governor Appointed 12 Members Issue: मूळ यादीच कायम ठेवा

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडी सत्तेत असताना विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला होता.

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत कोणतीच कारवाई केली नाही, हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. यावर आज (सोमवारी) दुपारी होणार आहे.

राज्यात सत्तातर झाले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली आहे. ठाकरे सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी शिंदे सरकारकडून बदलण्यात आली आहे.

या विरोधात सुनील मोदी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ठाकरे सरकारने दिलेली मूळ यादीच कायम ठेवावी, असे त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करायला हवं, राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली असल्याचे मोदी यांचे म्हणणं आहे. आज या प्रकरणावर दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता आह

विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर २१ मार्च रोजी सुनावणी होणार होती. मात्र, या प्रकरणी राज्य सरकारने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी ३ आठवड्यांनी पुढे ढकलली होती.

कुणाचा नंबर लागणार..

वारंवार मुदतवाढ मागितल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या सुनावणीत राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी काही आठवड्यांची मुदत मागण्यात येत आहे. सरकारने याआधी १४ ऑक्टोबर २०२२ ला चार आठवड्यांची मुदत मागितली होती. आता या १२ आमदारांमध्ये नेमका कुणाचा नंबर लागतो, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT