BS Yediyurappa News : शेट्टार पु्न्हा BJP मध्ये आले तर स्वागतच, पण..; येदियुरप्पा म्हणाले..

BJP will welcome jagadish shettar if comes back : शेट्टार यांना कॅबिनेट मंत्रीपदाची आँफर
B. S. Yediyurappa News
B. S. Yediyurappa NewsSarkarnama
Published on
Updated on

BS Yediyurapp bjp will welcome jagadish shettar if comes back : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे. त्यावर भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "शेट्टार यांना भाजपने प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री केले, पण त्यांनी केवळ स्वतःचा फायदा करुन केला," असे येदियुरप्पा यांनी सांगितले.

येदियुरप्पा म्हणाले, "शेट्टार यांची भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे, ते पुन्हा भाजपमध्ये येत असेल तर त्यांचे स्वागत आहे. पण जनता त्यांना माफ करेल का," असा सवाल येदियुरप्पा यांनी उपस्थित केला आहे.

भाजपा एक राष्ट्रीय पार्टी आहे, भाजपने जगदीश शेट्टार, लक्ष्मण सावदी आणि माझ्यासाठी खूप काही केले आहे. जगदीश शेट्टार यांना जनता भाजपमुळे ओळखते. त्यांच्या व्यक्तीगत कामाबाबत जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असे येदियुरप्पा म्हणाले. शेट्टार यांना कॅबिनेट मंत्रीपदाची आँफर दिली होती, पण त्यांनी ती स्वीकारली नाही, असे येदियुरप्पा यांनी सांगितले.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत नाव नसल्याने शेट्टार तीन दिवसापासून नाराज होते, अखेर शेट्टार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आपण विधानसभा सदस्य पदाचा पण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा विश्वेश्वर हेगडे यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

B. S. Yediyurappa News
Atique Ahmad News : अतिकच्या आयुष्याची चित्तरकथा..; वडील टांगा चालवायचे, मुलाने १७ व्या वर्षी केला पहिला खून ; महागड्या मोटारी..

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत नाव नसल्याने शेट्टार तीन दिवसापासून नाराज होते, अखेर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आपण विधानसभा सदस्य पदाचा पण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा विश्वेश्वर हेगडे यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

B. S. Yediyurappa News
Anna Hazare reacts arvind kejriwal :..तर केजरीवालांना शिक्षा झालीच पाहिजे ; अण्णा हजारेंचा घणाघात

राजीनामा देताना मला वेदना होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या काही नेत्यानी मी राजीनामा द्यावा, अशी परिस्थिती पक्षात निर्माण केली होती, असा आरोप शेट्टार यांनी केला आहे. भाजपमधील योगदान, विधानसभा अध्यक्षपदासह अन्य प्रमुख पदांवरील दिलेले योगदान यांची आठवण शेट्टार यांनी यावेळी पक्षश्रेष्ठींना करुन दिली.

"राज्यातील पक्षश्रेष्ठींनी मला कधी समजून घेतलं नाही. माझा अपमान करण्यात आला. त्यामुळे मी नाराज होतो. मी आता शांत बसणार नाही. त्यांनी मल आव्हान दिले आहे. ते मी स्वीकारणार आहे," असे शेट्टार म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ते निवडणूक लढविणार असल्याची शक्यता आहे.

पक्षातील काही नेत्यांनी माझ्या कुटुंबियांतील एका सदस्याला उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला होता, पण हा प्रस्ताव मी फेटाळून लावला. याबाबत मी नंतर सविस्तर माहिती देईल, असा गौप्यस्फोट शेट्टार यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com