Supriya Sule Sarkarnama
मुंबई

Supriya Sule On Budget : बिहार अन् आंध्र लाडका; महाराष्ट्र परका का? सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला जाब

Union Budget 2024 : बजेट मधे 2-4 चांगल्या गोष्टी आहेत पण त्या चांगल्या गोष्टी काँग्रेस आणि INDIA आघाडीच्या घोषणा पत्रातील आहेत.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : हे देशाचे बजेट आहे. कुठल्या राज्याचे बजेट नाही. त्यामुळे प्रत्येक राज्याला समान काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र या बजेटमध्ये बिहार आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांना भरघोस निधी दिल्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले.

यावर 'लाडकी बहीण' या योजनेची कोटी करत खासदार सुळेंनी मोदी सरकारवर घणाघात केला. केंद्रासाठी 'लाडका बिहार अन् आंध्र प्रदेश, पण महाराष्ट्र परका का?', असा थेट सवालच सुळेंनी उपस्थित करत केंद्र सरकारची कोंडी केली आहे.

सुळे Supriya Sule म्हणाल्या, देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या. सगळ्या राज्याला सारखा निधी मिळेल, असे वाटत होते. बिहार, आंध्रला निधी दिला त्याचे दुःख नाही, पण महाराष्ट्रावर अन्याय का ? लाडकी बिहार, लाडकी आंध्र प्रदेश असल्याचे दिसतेय. मग परका महाराष्ट्र का ?, महाराष्ट्राने अस काय केले की त्यांच्या मित्रपक्षांना का काही दिले नाही, असा थेट प्रश्न सुळेंनी उपस्थित केला आहे.

आता खुर्ची वाचवण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी किती गोष्टी करणार? आंध्र आणि बिहारला निधी मिळाला त्याचे संपूर्ण क्रेडिट देशाच्या जनतेला जाते. कारण यापूर्वी ३०० जागां जिंकल्यानंतर देशात मोदी सरकार होते, तर आता २४० आकड्यांमुळे देशात NDA सरकार बनले आहे. आंध्रप्रदेशाने यापूर्वीही याच मागण्या केल्या होत्या. मात्र त्यावेळी एकहाती सत्ता असतानाही मोदी सरकारने दुर्लक्ष केले होते, असा टोलाही सुळेंनी लगावला.

या बजेटमधे 2-4 चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या काँग्रेस Congress आणि INDIA आघाडीच्या घोषणा पत्रातील असल्याचा दावाही सुळेंनी केला. बजेटमधे अनेक गोष्टी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी केलेल्या सूचनांचा समावेश आहे. बजेटमधील टॅक्स रिफॉर्मचा मुद्दा जुनाच आहे. एजेंल टॅक्सची मूळ कल्पना काँग्रेसची आहे, असेही सुळेंनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT