Latur Politics : राष्ट्रवादीत फूट पडताच काँग्रेसकडून अहमदपूर-चाकूर मतदारसंघावर दावा..

Ahmadpur Assembly Constituency : 1972 ते 80 दरम्यान आठ वर्ष या मतदारसंघावर पीझंटस् अॅन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाच्या भाई देशमुख यांनी वर्चस्व गाजवले होते. विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते.
MLA Babasaheb Patil, Ahmadpur
MLA Babasaheb Patil, AhmadpurSarkarnama
Published on
Updated on

Latur Congress : अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे घ्या, अशी मागणी करत तालुक्यातील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नुकतीच माजी मंत्री व जिल्ह्याचे नेते अमित देशमुख यांची भेट घेतली. अहमदपुर-चाकूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील हे पक्ष फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला होती. पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता या जागेवर काँग्रेसने दावा सांगितला आहे. पक्षाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने अमित देशमुख (Amit Deshmukh) यांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदार संघ पक्ष श्रेष्ठीशी चर्चा करून काँग्रेस पक्षासाठी सोडवून घ्यावा, अशी मागणी करीत निवेदन दिले.

तसेच काँग्रेस पक्षाने दिलेला उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणू असा, विश्वास या शिष्टमंडळाने अमित देशमुख यांना दिला. मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच इथे सुरुवातीला काँग्रेसचे वर्चस्व होते. 1951 ते 2019 दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने या मतदारसंघात पाच वेळा विजय मिळवला होता.

MLA Babasaheb Patil, Ahmadpur
Union Budget 2024 : अर्थसंकल्प म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्याची कॉपी! राहुल गांधींचा प्रहार...

भाजपने तीन वेळा, राष्ट्रीय समाज पक्ष, अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (Congress) या मतदारसंघात प्रत्येक एक विजय मिळवला आहे. 1972 ते 80 दरम्यान आठ वर्ष या मतदारसंघावर पीझंटस् अॅन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाच्या भाई देशमुख यांनी वर्चस्व गाजवले होते. विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या विनायक पाटील यांचा 29 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.

नुकत्याच झालेल्या लातूर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे डाॅ. शिवाजी काळगे हे विजयी झाले. भाजपच्या सुधाकर शृंगारे यांचा त्यांनी 61 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. जिल्ह्यात काँग्रेससाठी हा विजय कमबॅक करणारा ठरला.

MLA Babasaheb Patil, Ahmadpur
Union Budget 2024 : ‘हे तर खुर्ची बचाव बजेट’; विरोधकांनी मोदी सरकारच्या वर्मावरच ठेवले बोट...

या विजयाने काॅन्फिडंस वाढलेल्या काँग्रेसने आता राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघावरच दावा केला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे काँग्रेसने अहमदपूर-चाकूरवर दावा केल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com