Mohit Kamboj On Sushama Andhare
Mohit Kamboj On Sushama Andhare Sarkarnama
मुंबई

Mohit Kamboj On Andhare: ''सुषमा अंधारे,राखी सावंत बहिणी; त्यांची एकमेकींशीच स्पर्धा...''; कंबोज यांनी डिवचलं

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणा पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. या प्रकाराचा निषेध कररुन राज्यात आरोप प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच तापलं आहे. रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushama Andhare) यांनी शिंदे गटासह उपमुख्यमंत्री फडणवीसांवरही जोरदार टीका केली होती.आता भाजपकडून अंधारे यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी जनप्रक्षोभ सभेत बोलताना फडणवीसांवर चांगलाच निशाणा साधला होता.यावेळी त्यांनी फडणवीसांचा झुकेगा नहीं घुसेगा साला हा डायलॉग भारीच होता. पण २०१६ पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला सात वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काही पटत नाही राव असं म्हणत फडणवीसांवर टोला लगावला होता.

...तर उद्धव ठाकरे हे तोफ

अंधारे म्हणाल्या, तुम्ही स्वत:ला काडतूस समजत असाल तर उद्धव ठाकरे हे तोफ आहे, तोफेसमोर काडतुसाचा निभाव लागत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

अंधारेंची तुलना अभिनेत्री राखी सावंतशी...

याचदरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांचं टि्वट चर्चेत आलं आहे. कंबोज यांनी टि्वटद्वारे सुषमा अंधारे यांच्यावर आरोप केला आहे. सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोन्ही बहिणी आहेत. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहीण महाराष्ट्राच्या सिनेमामध्ये. दोन्ही बहिणी एकमेकींशी स्पर्धा करत आहेत की, रोज सगळ्याच जास्त सनसनाटी कोण निर्माण करेल अशी खोचक टीका कंबोज यांनी अंधारे यांच्यावर केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT