Sushma Andhare News Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare News : "राज ठाकरेंना मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत", सुषमा अंधारेंनी ललकारलं

Raj Thackeray Vs Sushma Andhare : राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्यापासून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. यातच सुषमा अंधारेंनीही राज ठाकरेंना जशात तसं उत्तर दिलंय.

Akshay Sabale

Mumbai News, 14 May : 2022 पासून महाराष्ट्राला फोडाफोडीचं राजकारण नवीन नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फूट सर्वश्रूत आहे. पण, मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर टीकेचे 'बाण' सोडले आहेत.

"आमचा पक्ष फोडला, असं सध्या बोलत आहेत. पण, मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंनी फोडले. तेव्हा काही वाटलं नाही का?" असा सवाल राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपस्थित केला होता. याच मुद्द्यावरून सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. "तुमचे आमदार फोडल्यावर भाजपला जाब विचारण्यासाठी तुमच्या तोंडात दात नव्हते का?" असा तिखट प्रश्न विचारत शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Anadhare) राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे काय म्हणाले?

"सध्या वडील चोरले या मुद्द्यावर निवडणूक सुरू आहे. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही आणि होणार नाही. पण, आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, असं सध्या जे ओरडत आहेत. त्यांनी आपण काय उद्योग केलेत पाहा. याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवकर खोके-खोके देऊन तोडले होते. त्यावेळी काही वाटल नाही का? नगरसेवक मागितले तर दिले असते," असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

याला सुषमा अंधारेंनीही सडेतोड उत्तर दिलं आहे. "जे मिनिटा-मिनिटाला आपली भूमिका बदलत असतात. ते राज ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरेंनी आमचे नगरसेवक फोडले. तुमचे सहा नगरसेवक शिवसेनेत आल्यावर फोडल्याचं आठवत आहे. मग, राम कदम, मनोज सांगळे, प्रविण दरेकर भाजपमध्ये गेलेत ना... तेव्हा राज ठाकरेंनी आमचे आमदार का फोडले, असा प्रश्न भाजपला विचारला नाही. त्यांच्या तोंडात बोलायला दात नव्हते का? पुण्यात रूपाली ठोंबरे, वसंत मोरे यांना कुणी फोडलं? राज ठाकरेंना मुंबई घाबरत असेल, मी घाबरत नाही," असं म्हणत अंधारेंनी एकप्रकारे ललकारलं आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, म्हणून ते माणसं फोडायचं काम करतात. मोदी यांना स्वत:च्या 'गॅरंटी'वर विश्वास असता, तर ते स्वत:च्या हिंमतीवर निवडणूक लढले असते. त्यांनी अनेक ठिकाणी अनेक पक्ष फोडले. महाराष्ट्रात आधी आपले 40 आमदार फोडले. नंतर अजित पवार यांना फोडलं. तरीही 'गॅरंटी' वाटेना म्हणून काही सुपारीबहाद्दरांना सोबत घेतलं. उठ दुपारी घे सुपारी. सध्या सुपाऱ्या जोरात वाजतात. सुपारीबहाद्दर काहीतरी 'लॉजिक'ल मुद्दे बोलतील, असं वाटलं होतं. पण, तेच-तेच मुद्दे भाषणात बोलतात आहे. कारण, अभ्यास करायला वेळ कुठाय?" असा खोचक टोला सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT