Mumbai News : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा ‘छावा’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा अवघ्या पाच दिवसांत 200 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
हा चित्रपट पाहिल्यावर अनेकांकडून सोशल मीडियावर भावुक प्रतिक्रिया देतानाच या चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलं जात आहे.अशातच नेहमीच वादात अडकणार्या अभिनेत्री स्वरा भास्करने आता 'छावा'वर प्रतिक्रिया देताना नव्या वादाला तोंड फोडले आहे.याचमुळे भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी स्वरालाच चांगलंच झापलं आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhaskar) आपल्या ट्विटमध्ये थेट ‘छावा’चा उल्लेख केलेला नसला तरी तिचा रोख हा याच चित्रपटाकडे असल्याचं लपून राहिलेलं नाही. एकीकडे कित्येक वर्षांनी छत्रपती संभाजीराजेंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आल्यामुळे प्रेक्षकांकडून हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी केली जात आहे. यातच आता स्वराने वादग्रस्त विधान केल्यामुळे आमदार चित्रा वाघ यांनी तिला चांगलंच खडसावलं आहे.
चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर ट्विट करत स्वरा भास्करच्या ट्विटवर संतप्त पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या,स्वरा भास्कर यांना कुठे काय बोलायचं, याचं तारतम्य उरलं नाही हे नक्की..दिल्लीमध्ये चेंगराचेंगरी होऊन दुर्दैवी मृत्यू झाले, ही घटना खरंच क्लेशदायक होती आणि आहे. पण त्या घटनेचा आमच्या राजाशी सांगड घालण्याची काहीही गरज नव्हती.स्वरा भास्कर आमचे छत्रपती संभाजीराजे हे काल्पनिक नव्हते, त्यांच्यावरती क्रूर अत्याचार करणारा औरंग्यादेखील काल्पनिक नव्हता हे तर तू मान्य करशीलच,अशा शब्दांत स्वराची कानउघडणी केली आहे.
तसेच त्यामुळेच आमच्या राजावरती होणारे अत्याचार पाहून प्रत्येक संवेदनशील मनाला त्रास झाला आणि त्या औरंग्याचा प्रचंड राग आला.त्यामुळेच प्रत्येक भारतीयाला हा इतिहास समजायलाच हवा जो तुमच्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या लोकांनी सोयीने बदलल्याची टीकाही भाजपच्या वाघ यांनी केली आहे.
वाघ म्हणाल्या, आजही जेव्हा सत्य समोर येतंय, खरा इतिहास लोकांना कळतोय, तेव्हा तुम्हाला आणि तुमच्यासारख्या अनेकांना पोटशूळ का होतोय? हे समस्त भारतीयांना चांगलंच उमगलंय. त्यामुळेच आमच्या महाराजांबद्दल गरळ ओकणं बंद कर... तुमच्यासारख्या मुर्दाड मनाच्या लोकांची आता कीव येऊ लागली आहे असंही वाघ यांनी अभिनेत्री स्वरा भास्करला फटकारलं आहे.
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटावर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्करने मात्र टीका केली आहे.‘छावा’ला मिळणाऱ्या भरभरून प्रतिक्रियांची तुलना तिने काही दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात घडलेल्या दुर्घटनेशी केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने आपल्या ट्विटमध्ये‘एका सुशोभित आणि काल्पनिक चित्रपटात 500 वर्षांपूर्वी हिंदूंवर होणारा अत्याचार पाहून लोक संतापलेले दिसत आहेत. परंतु महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी आणि गैरव्यवस्थापनावर होणारे भयानक मृत्यू आणि जेसीबी बुलडोझरने मृतदेह उचलण्याबद्दल ते गप्प आहेत.हा समाज मेंदू आणि आत्म्याने मृत झालेला समाज आहे’, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया देत टीका तिने केली आहे,याच टीकेला भाजपच्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.