Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप ? शिंदे-फडणवीस तडकाफडकी दिल्लीत; अजितदादा नाराज ?

Amit Shah : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

Ganesh Thombare

Mumbai News: राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीत महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत आज महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते, तर याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार हे आजारी असल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

पण दुसरीकडे मात्र, अजित पवारांनी तातडीने देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) मंत्र्यांसह आमदारांची बैठक बोलावली. त्यामुळे अजितदादा नेमके नाराज आहेत की, आजारी आहेत ? याबाबत आता सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

यातच काही दिवसांपूर्वी भाजप-शिवसेना युतीच्या मुंबई समन्वय समितीची मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. पण या बैठकीला राष्ट्रवादीला डावललं गेल्याची चर्चा आहे. तसेच काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत आले होते.

त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. मात्र, अजित पवार गैरहजर होते. एवढंच नाही तर शाहांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर सागर बंगल्यावर बंद दाराआड तब्बल ४५ मिनिटांपेक्षा जास्त चर्चा केली होती. पण महत्त्वाचं म्हणजे या चर्चेलाही अजित पवार नव्हते.

तर मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सरकारमधील सर्वच विभागांमध्ये हस्तक्षेप वाढत असल्याने शिंदे गटासह भाजपच्या काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे ना ? याबद्दल आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

दरम्यान, सरकारमधील एक गट नाराज असल्याच्या मुद्द्यांवर अमित शाह, शिंदे, फडणवीस यांच्यात खलबतं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजपचे हायकमांड शिंदे-फडणवीसांना काय आदेश देतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT