Gram Panchayat Election: ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; ऐन दिवाळीत उडणार धुरळा

Political News : मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायती व एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार
Gram Panchayat Bypoll Election
Gram Panchayat Bypoll ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mangalwedha News: जानेवारी ते डिसेंबर 2023 या दरम्यान मुदत संपणाऱ्या नवनिर्मित तसेच 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आता ऐन दिवाळीत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आज 2359 ग्रामपंचायतींची, तर 3080 ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यपदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 17 जानेवारी 2023 आदेशान्वये राज्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित व 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम देण्यात आला आहे.

Gram Panchayat Bypoll Election
Nanded Incident : डीनला ही शिक्षा देता, मग आरोग्य मंत्र्यांना जाब विचारणार का?; कोल्हेंचा हेमंत पाटलांना सवाल

या ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना 25 एप्रिलला राज्य निवडणूक आयोगाने आलेल्या हरकती विचारात घेऊन अंतिम केली. या कार्यक्रमानुसार राज्यातील सुमारे 2289 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाल्याचे शासनाने 25 मे, 2023 च्या पत्रान्वये कळविले. 14 जुलैला या ग्रामपंचायतींची मतदार यादी अंतिम झाली होती. आता आज निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

निवडणूक कार्यक्रम कसा असणार ?

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, 6 ऑक्टोबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, 16 ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 ते 3 या वेळेत अर्ज दाखल करणे, 23 ऑक्टोबरला दाखल अर्जाची छाननी तर 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे. आवश्यकता भासल्यास निवडणूक 5 नोव्हेंबरला घेण्यात येणार असून, 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

मंगळवेढ्यातील 27 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार

मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायती व एका ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे यंदा ऐन दिवाळीत मंगळवेढ्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

मंगळवेढा तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आहेत, तर आमदार समाधान आवताडे यांचा गट व 'बीआरएस'चे भगीरथ भालके यांच्या गटाबरोबरच परिचारक यांचा गट या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे राजकीय धुराळा उडणार आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने या निवडणुकीत रंगत वाढणार आहे.

मंगळवेढ्यातील 'या' ग्रामपंचायतीची निवडणूक...

मानेवाडी, शिरसी, जंगलगी, आंधळगाव, नंदूर, लक्ष्मी दहिवडी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, खुपसंगी, रड्डे, खडकी, बठाण, मुंढेवाडी, हिवरगाव, महमदाबाद हु, देगाव, उचेठाण, निंबोणी, चिक्कलगी, जुनोनी, ब्रम्हपुरी, भाळवणी, अकोला, शेलेवाडी, डिकसळ, जालीहाळ, लोणार.

Edited By- Ganesh Thombare

Gram Panchayat Bypoll Election
Eknath Shinde Cabinet Meeting: दिवाळीआधीच शिंदे सरकारची मोठी घोषणा; सर्वसामान्यांना दिलं मोठं 'गिफ्ट'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com