Eknath Shinde Cabinet Meeting: दिवाळीआधीच शिंदे सरकारची मोठी घोषणा; सर्वसामान्यांना दिलं मोठं 'गिफ्ट'

Maharashtra Politics : मंत्रिमंडळ बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
Eknath Shinde and Devendra Fadnavis
Eknath Shinde and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मुंबईत पार पडली. या वेळी सरकारच्या वतीने पाच मोठे निर्णय घेण्यात आले. याबरोबरच या बैठकीत दिवाळीनिमित्त 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.

पण या वर्षी देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या संचामध्ये आता मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात आला आहे. या आधी आनंदाचा शिधा या संचात साखर, रवा, चना डाळ आणि खाद्यतेल देण्यात येत होते. आता यामध्ये वाढ करत मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News : " येत्या निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनवणं हे भाजपसाठी नाहीतर भारतासाठी महत्त्वाचं..."

हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 530 कोटी 19 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. याबरोबरच कृषिपंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी आता उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय झाले ?

  • विदर्भ आणि मराठवाड्यातील कृषिपंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यात येणार. तसेच उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय.

  • दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय. यंदा यामध्ये मैदा आणि पोह्याचादेखील समावेश करण्याचा निर्णय.

  • इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय.

  • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार या योजनेचा लाभ.

  • नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय. याबरोबरच ४५ पदांनाही मंजुरी देण्यात आली.

    Edited By- Ganesh Thombare

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Pimpri-Chinchwad : शरद पवारांची 'सरप्राइज व्हिजिट'; पिंपरी-चिंचवडमध्ये तिघांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com