Shiv Sena UBT Crisis Tejasvi Ghosalkar Resignation  Sarkarnama
मुंबई

Tejasvi Ghosalkar: घोसाळकरांची नाराजी ठाकरे दूर करतील का? 'मातोश्री'वरील भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर काय म्हणाल्या?

Shiv Sena UBT Crisis: तेजस्वी घोसाळकर यांच्या राजीनाम्यामुळे उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकी पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी 'जय महाराष्ट्र' केला आहे. अजूनही ठाकरे गटातील गळती थांबलेली दिसत नाही.

ठाकरे कुटुंबाशी जवळचे संबध असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा स्थानिक नेतृत्वाला कंटाळून मंगळवारी राजीनामा दिला आहे. घोसाळकर यांचा राजीनाम्यानंतर उत्तर मुंबई महापालिका निवडणुकीची समीकरणं बदलणार असल्याचे बोलले जाते. घोसाळकर यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली.

स्थानिक नेतृत्वाला कंटाळून आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी ठाकरेंना सांगितले. उद्धवसाहेब आपल्याला न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाकरेंच्या भेटीनंतर आपण दोन-तीन दिवसात निर्णय घेणार असल्याचे घोसाळकर यांनी माध्यमांना सांगितले. नाराजी दूर झाली का नाही, असे त्यांना विचारले असता 'लवकरच समजेल,'असे त्या म्हणाल्या.

स्थानिक नेतृत्वाबाबत घोसाळकरांची ठाकरेंकडे तक्रार केल्यानंतर ठाकरेंनी त्यांची समजूत काढली का? हे मात्र समजू शकले नाही. तेजस्वी घोसाळकर यांच्या राजीनाम्यामुळे उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

वर्षभरापूर्वी त्याचे पती अभिषेक यांच्यावर मॉरीस नरोन्हाने फेसबुक लाइव्ह करत गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. २०१७ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा पराभव करत, तेजस्वी पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.त्या शिवसेना किंवा भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. तेजस्वी या माजी आमदार विनोद घोसळकर यांच्या सून आहेत. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत.

राजीनामा पत्रात "मी तेजस्वी घोसाळकर महिला - दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा राजीनामा स्वीकारावा," असे त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT