प्रकाश लिमये
rime News : तेलंगणा राज्यात सुरु असलेला एमडी हा अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा क्र.४ ने उध्वस्त केला आहे. कारखान्यातून तीन किलो एमडी सह हजारो लिटर जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे सहा कोटी आहे.
पोलीसांनी एप्रिल महिन्यात मिरा रोडमधील नयानगर येथे रहाणार्या फिरदोस अरबाज कुरेशी हीच्या घरातुन एकुण १ किलो ३२४ ग्रॅम वजनाचा एकुण २,६६,१७,२८० रुपये किंमतीचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला होता.
त्यात फिरदोस सह तीचा पती अरबाज वकील कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासात मिरारोड तसेच मुंबई येथील आग्रीपाडा, मालवणी, मनोरी परिसरातून एमडी तयार करण्यासाठी लागणारे रसायन व लॅबचे साहित्य असा एकुण १३.६५ कोटी रुपयाचा मुददेमाल जप्त करुन १५ आरोपींना अटक करण्यात आली होती.
त्यातील आणखी आरोपी संदिप विरास्वामी नायडु याला रायगड जिल्ह्यातील खालापुर येथुन नसिर ऊर्फ बाबा जानिमीया शेख व मेहमुद मेहबूब खान यांना २९ मे रोजी हैदराबाद येथुन अटक करण्यात आली.
उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली निरिक्षक प्रमोद बडाख यांनी आरोपींकडे केलेल्या चौकशीत नसिर ऊर्फ बाबा जानिमीया शेख याने तेलंगणा राज्यातील पिचारगडी तांडा येथे २ एकरात थाटलेल्या फार्म हाऊस मध्ये एमडी ड्रग तयार करण्याचा कारखाना उभा केल्याची माहिती मिळाली.
त्याठिकाणी धाड टाकुन पोलीसांनी ३ किलो एमडी, त्यासाठी लागणारे २२९३ लिटर रसायन व प्रयोगशाळा साहीत्य असा एकुण ६.२२ कोटी रुपये किंमतीचा माल जप्त केला.
या गुन्हयात आतापर्यंत एकुण २०.७२ कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.