Gokul Politics : गोकुळच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत फूट? भाजप आमदाराकडून सतेज पाटलांसोबत युतीचे संकेत

Shivajirao Patil on Gokul Politics : गेल्या काही दिवसांपासून आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ मुक्त गोकुळची निवडणूक लढवू असा इशारा दिला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून लढण्याच्या सूचना दिल्यानंतर कोल्हापुरात महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक पार पडली.
Shivajirao Patil, Satej Patil
Shivajirao Patil, Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 03 Jun : गेल्या 25 वर्षात गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा भागावर अन्याय झाला आहे. त्यामुळे गडहिंग्लज विभागाला सन्मानजनक जागा न मिळाल्यास वेगळा विचार करावा लागेल. गोकुळमध्ये केवळ स्वतःचाच विचार करत असतील तर आमदार सतेज पाटील हे आम्हाला लांबचे नाहीत, असा इशारा भाजपचे घटक पक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.

गडहिंग्लज विभागातील भाजप कार्यकर्ते आणि संस्था प्रतिनिधींची बैठक पार पडली या बैठकीत त्यांनी हा इशारा दिला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील एका शिक्षण संकुलात ही बैठक पार पडली. यावेळी गडहिंग्लज तालुक्याच्या वाटणीला किमान पाच जागा तरी मिळाव्यात. त्यासोबत अध्यक्ष पद ही मिळावे. यासाठी आपला आग्रह असणार आहे.

गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन किमान 500 ठराव तरी गोळा करावेत. अशा सूचना आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिल्या. जिल्ह्यात गोकुळच्या जीवावर अनेक जण मोठे झाले. पण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप काही पडलेलं नाही.

त्यामुळे आपण प्रशासक पदासाठी आग्रही राहिलो. अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर खरं सत्य समोर येईल. यावेळी मात्र गोकुळच्या सत्तेत आपण असणार आहोत. असेही आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटले आहे.

Shivajirao Patil, Satej Patil
Cockroach Janata Party : "भारतात येताच अटक, मला विमानतळावरच भेटा..." कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंनी आपल्या समर्थकांना केलं मोठं आवाहन

गेल्या काही दिवसांपासून आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ मुक्त गोकुळची निवडणूक लढवू असा इशारा दिला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून लढण्याच्या सूचना दिल्यानंतर कोल्हापुरात महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक पार पडली.

Shivajirao Patil, Satej Patil
Police employee suicide : पोलिस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला नवे वळण; पत्नीविरोधात गुन्हा, तपासात धक्कादायक दावे

या बैठकीला आमदार शिवाजीराव पाटील यांना निमंत्रित केले नव्हते. मंत्री हसन मुश्रीफ हे महायुतीसोबत असल्याने आमदार शिवाजीराव पाटील यांनी सतेज पाटील आपल्याला लांबचे नाहीत असे विधान केल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com