Sanjay Raut : विधान परिषद निवडणूक; संजय राऊत हे काय बोलून गेले...

Sanjay Raut latest statement on MLC election : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जाणून घ्या नेमके काय म्हणाले.
Sanjay Raut on legislative council election
Sanjay Raut on legislative council electionSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena UBT News: महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुका आणि त्यातील मतदारांची संख्याबळ बोलके आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने निवडणुका बिनविरोध होऊ नये हीच मुख्य भूमिका घेतलेली आहे. नाशिकमध्ये पक्षाचा निर्णय चर्चेअंती झालेला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना संपर्क नेते रवींद्र मेडलेकर यांनी याबाबतची घोषणा केली होती. या घोषणेमुळे भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर टीकेच झोड उठवली होती. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने नाशिक मतदारसंघातून उमेदवार दिला. या संदर्भात माजी आमदार अनिल कदम आणि वसंत गीते यांनी उमेदवारी अर्ज घेतले होते. मात्र त्यांनी अर्ज दाखल केले नाही, त्यामुळे पक्षात असंतोष असल्याच्या वावड्या होत्या.

Sanjay Raut on legislative council election
Cockroach Janata Party : "भारतात येताच अटक, मला विमानतळावरच भेटा..." कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंनी आपल्या समर्थकांना केलं मोठं आवाहन

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज नाशिक येथे भूमिका स्पष्ट केली. या निवडणुका आणि त्याचे निकाल स्पष्ट दिसत आहेत. मध्यंतरी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल पुरेसे बोलके आहेत. त्यामुळे या निवडणुका वर्तमानपत्रासाठी बातम्या नाहीत, असे ते म्हणाले.

नाशिक मतदार संघात उमेदवारी अर्ज देण्याचा निर्णय प्रारंभी झाला होता. निवडणुका बिनविरोध करायचा नाही हे उद्धव ठाकरे पक्षाचे मुख्य धोरण होते. त्यादृष्टीने आम्ही मातोश्रीवर तसेच मुंबईला आणि स्थानिक नेत्यांची चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतलेला आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेत निवडणुकांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे हा पक्ष काही मुख्य राजकीय फोर्स नाही. तो फक्त पैशांचा फोर्स आहे, या शब्दात राऊत यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षावर टीका केली.

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, बरे आहे यानिमित्ताने शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांना किमान पैसे तरी मिळतील. हे बोलून गेल्यावर ते स्वतःशीच हसले. हे काय बोलून गेलो, ही आपली भावना त्यांना लपवता आली नाही.

Sanjay Raut on legislative council election
Police employee suicide : पोलिस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला नवे वळण; पत्नीविरोधात गुन्हा, तपासात धक्कादायक दावे

खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे संपर्क नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com