Ajit Pawar|
Ajit Pawar|  
मुंबई

TET EXam Scam : तर नव्याने शिक्षक भरती होऊ शकते: अजित पवार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : टीईटी घोटाळा (TET EXam Scam) प्रकरणात योग्य ती चौकशी व्हावी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. ते विरोधी पक्षातील असो वा सत्ताधारी पक्षाचे असो. दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. माध्यामांना दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

टीईटी घोटाळ्यात (TET Scam) माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या एका मुलाचं आणि तीन मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. हीना सत्तार, उजमा सत्तार, हुमा फरहीन सत्तार, आमेर सत्तार अशी सत्तार यांच्या मुलांची नावं आहेत.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, आरोग्य भरती परीक्षा घोटाळा आणि शिक्षक पात्रता भरती परीक्षेत पेपरफुटी झाल्याची माहिती तपासातून समोर आली होती. त्यामुळे या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुन्हा पारदर्शक परीक्षा होण्यासाठी मी तत्त्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. तसेच, हे प्रकरण समोर आले तेव्हा, मला शालेय आयुक्तांनी सांगितलं होत, की हे सर्व रद्द करण्यात येणार आहे. यासंबधींचा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे. नव्या शिक्षक भरतीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली की आम्ही नव्याने शिक्षक भरती करणार आहोत.

सत्तार म्हणाले, हे आरोप खोटे आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. नक्की सत्तर म्हणतात ते खर की बातमी खरी आहे. असाही सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. काही चुकीचे झाले असेल तर चौकशी झाली पाहिजे,असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. पण अजून अधिकृत कळालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली ट्रीप झाल्यानंतर आज पण चर्चा झाली. पण अजुन अधिकृत कोणतीही माहिती आलेली नाही. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना बोलवले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आम्हाला अजून निमंत्रण आलेले नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत न्युज चॅनेल्सवर सुरु आहे. विस्तार असेल तर आम्हाला निमंत्रण दिले जाते. कदाचित उशीरा निमंत्रण येऊ शकतं.

उद्या कामकाज सल्लागार बैठक बोलवली म्हणजे अधिवेशन बोलवायचे यासाठी ही बैठक बोलवली असणार. एकनाथ शिंदे गट वेट अँड वाच च्या भूमिकेत आहे. मंत्रिमंडळ शपथ कार्यक्रमाबाबत बाबत कॉल येण्याची प्रतीक्षा आहे. अजून शिंदे गटातील एकही आमदाराला कॉल न आल्याने चलबिचल सुरु झाली आहे. रात्री उशिरा शिंदे गटातील आमदारांना कॉल जाणार असल्याची माहिती आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, विधान परिषदेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेची संख्या जास्त आहे. विरोधी पक्षात संख्या जास्त त्यांना विरोध पक्ष नेते देण्यात येत, असही त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT