Devendra Fadnavis-Raj Thackeray-Uddhav Thackeray-Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Mahayuti Government : पवारांसह ठाकरे बंधू महायुती सरकारच्या शपथविधीला जाणार नाहीत

Devendra Fadnavis Swearing Ceremony : महायुतीचा बहुचर्चित शपथविधी सोहळा आज सायंकाळी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शपथ घेणार आहेत.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 05 December : महायुतीचे सरकार आज अस्तित्वात येणार असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तिसऱ्यांदा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडीचे प्रमुख, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मात्र शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला प्रामुख्याने महायुतीचे नेतेच उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

महायुतीचा (Mahayuti) बहुचर्चित शपथविधी सोहळा आज सायंकाळी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शपथ घेणार आहेत. याशिवाय भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे राजशिष्टाचार विभागाने सर्व माजी मुख्यमंत्री, तसेच महत्वाच्या व्यक्तींना निमंत्रण पाठवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना सोहळ्याच्या निमंत्रणासाठी फोन केल्याची माहिती आहे. याशिवाय, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण आहे. राज्यातील पवार, ठाकरे या प्रमुख नेत्यांसह भाजपचे देशभरातील सर्व मुख्यमंत्रीही फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे मात्र शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहणार आहेत.

दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे शरद पवार हे दिल्लीत आहेत. त्यामुळे पवार हे शपथविधीला येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT