
Mumbai News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाल्याने सरकारवरील जबाबदारी वाढल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यानंतर आता त्यांच्या शपथविधीआधीच विरोधकांच्या मागण्याही सुरू झाल्या आहेत. यामध्ये आघाडी घेतली आहे ती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी.
दानवे यांनी फडणवीस यांचे अभिनंदन करतानाच मराठवड्यासाठी दहा मागण्या केल्या आहेत. देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेत आहेत. त्यांचे अभिनंदन, असे म्हणत दानवेंनी विरोधी पक्ष म्हणून मराठवाड्यासाठी काही माफक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून हे मराठवाड्याला मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
1. जायकवाडी धरणाच्या कालव्यांची जलवहन क्षमता निम्म्यापेक्षा खाली गेली आहे. या कालव्यांचे पुनरुज्जीवन करून पाण्याची गळती शून्यावर आणत नासाडी रोखावी.
2. पाटबंधारे विभागात रिक्त असलेल्या पदांची सरळ भरती करून मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.
3. छत्रपती संभाजीनगर- नगर- पुणे ऍक्सेस कंट्रोल्ड महामार्ग केवळ कागदावर नको, तो प्रत्यक्षात यावा. संभाजीनगर- नगर- पुणे या विद्यमान मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दुमजली रस्तेनिर्मिती व्हायला हवी.
4. जालना- नांदेड दरम्यान ऍक्सेस कंट्रोल्ड महामार्ग निर्मितीच्या कामाचा आरंभ आणि त्याचे लोकार्पण विद्युतगतीने व्हायला हवे.
5. ऑरिक- बिडकीनच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमी अधिग्रहण आणि किमान दीड लाख कोटींची गुंतवणूक मराठवाड्यात द्यावी.
6. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आपल्या आश्वासनाप्रमाणे 'तीन महिन्यात' शहरवासीयांना दररोज पाणी द्या. अन्यथा आंदोलनांच्या मालिकेला सामोरे जा.
7. मराठवाड्यात बोटावर मोजण्याइतकी शहरे उरली आहेत जिथे नागरिकांना दरदिवशी पाणी मिळते. मराठवाड्यातील तमाम शहरांच्या पाणीप्रश्नांवर तातडीने उपायोजना हव्यात आणि कालबाह्य पाणीपुरवठा यॊजना बाद करून नागरिकांना दरदिवशी पाणी देण्याची तजवीज करावी.
8. पर्यटकांची वाढती संख्या पाहता छत्रपती संभाजीनगरला उदयपूर, बोधगया आदी ठिकाणांशी जोडण्याकरिता विमानांची अधिक उड्डाणे द्या.
9. घृष्णेश्वर, परळी आणि औंढा नागनाथ ही ज्योतिर्लिंगे महाराष्ट्राचाच भाग आहेत. देशातील अन्य ज्योतिर्लिंग मंदिरांच्या धर्तीवर इथेही विशेष निधी देऊन विकासकामे हाती घ्यावीत.
10. विदर्भातील 'मिहान'च्या शिष्टमंडळाने मराठवाड्यातील उद्योजकांना इथे येऊन स्थलांतराच्या नावाखाली प्रलोभने देऊ नयेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.