Ashish Shelar, Raj Thackeray And Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : ठाकरे बंधुंची टीका भाजपच्या जिव्हारी; काल भावकीचा खेळ पाहिला म्हणत आशिष शेलारांचा पलटवार

Thackeray Brothers Unite After 20 Years : मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त असा विजयी मेळावा शनिवारी (ता.06) पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले.

Jagdish Patil

Mumbai News, 06 Jul : मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त असा विजयी मेळावा शनिवारी (ता.06) पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले.

तर आम्हाला एकत्र आणण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्याची टीका दोन्ही ठाकरे बंधुंनी केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा थेट अनाजी पंत असा उल्लेख केला. ठाकरेंची ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे.

कारण भाजप नेते आशिष शेलार यांनी थेट पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. दोन भाऊ आणि दोन कुटुंब एकत्र आली याचा आनंद आहे. मात्र, दोन पक्ष एकत्र येतील की नाही, हे त्या दोन पक्षांचा निर्णय आहे. परंतु कालचा कार्यक्रम हा मांडलेला इव्हेंट होता. एकाचं भाषण अपूर्ण, तर दुसऱ्याच अप्रासंगिक होतं, अशी टीका शेलारांनी केली.

शेलार म्हणाले, त्रिभाषा सूत्र कोणी आणलं हे देखील त्यांना माहिती नाही. देशात कुठे त्रिभाषा सूत्र आहे हे गुगल केलं असतं तरी समजलं असतं. टोमणे मारणी ही उद्धव ठाकरेंची पद्धत असून त्यांच्या मनात सत्ता गेल्याची सल दिसली. ट ला ट आणि फ ला फ लावून उद्धव यांनी भाषण केलं.

अनाजी पंत म्हणजे काय? आमच्याकडेही नावं आहेत. दोघांच्या भाषणामध्ये प्रामाणिकपणा नव्हता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारने मराठी दिला, तेव्हा या दोघांची तोंडं बंद होती. दोघेही राजकीय भूमिका मांडत आहेत. मराठीशी त्यांना काही देणंघेणं नाही, असंही शेलार म्हणाले.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

कालच्या विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "बऱ्याच वर्षांनी दोघांची भेट व्यासपीठावर झालेय. आज आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की आमच्या दोन्ही भावांमधला जो अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. ते आरोप करतात की म मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे. पण मी सांगतो म महापालिकेचाच नव्हे तर महाराष्ट्राचा आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT