Raj Thackeray Politics : 'जय गुजरात' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंवर राज ठाकरे काहीच बोलले नाहीत, 'शिवसेना' अजुनही आशावादी!

Eknath Shinde Uday Samant Raj Thackeray : शिंदेचे दुसरे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना राज ठाकरेंच्या भाषणाचे मात्र कौतुक केले. ते म्हणाले, मराठीच्या मुद्यावर त्यांचे भाषण अतिशय मुद्देसूद झाले.
Uday samant Raj Thackeray Eknath Shinde
Uday samant Raj Thackeray Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Politics : ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात'ची घोषणा एका कार्यक्रमात दिली होती. मेळाव्याच्या पूर्वसंध्येला शिंदेंनी दिलेल्या घोषणेमुळे राजकारण चांगलेच पेटले होते. उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर जोरदार प्रहार केला. मात्र, राज ठाकरेंचे भाषणामध्ये शिंदेंचा साधा उल्लेखही नव्हता, ना त्यांनी त्यांच्या जय गुजरातच्या घोषणेवर काही भाष्य केले.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक केले तर त्यांच्या शिवसेना पक्षाच्या ट्विटरवरून कविता शेअर करत उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका करण्यात आली तर राज ठाकरेंच्या भाषणाला प्रबोधक, मराठी प्रेमी, प्रगल्भ अशी विशषणे वापरण्यात आली आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे राज ठाकरेंविषयी अजुनही आशावादी असल्याचे चित्र आहे.

मंत्री उदय सामंत यांनी या मेळाव्यानंतर प्रतिक्रिया देतान म्हटले की, उद्धव ठाकरेंचे भाषण हे फस्ट्रेशनवाले होते. तर, राज ठाकरेसाहेबांनी भाषण हे एथिक्स पाळून केले होते. आपली आणि राज ठाकरेसाहेबांची मैत्री ही राजकारणाच्या पलिकडची आहे. त्यामुळे त्यांनी वेळ दिला तर आपण गप्पा मारायला जाणार असल्याचे देखील सामंत यांनी सांगितले.

Uday samant Raj Thackeray Eknath Shinde
Raj-Uddhav Thackeray Alliance : सत्तेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले म्हणणाऱ्यांना मनसेचे सणसणीत उत्तर, 'तो' फोटो दाखवला अन् गारच केले

शिंदेचे दुसरे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना राज ठाकरेंच्या भाषणाचे मात्र कौतुक केले. ते म्हणाले, मराठीच्या मुद्यावर त्यांचे भाषण अतिशय मुद्देसूद झाले. राज ठाकरे हे सर्वांचे मित्र आहे. त्यांना कधीही कोणी भेटायला जाऊ शकतं. मात्र, दुसऱ्याच तसं नाही.

महापालिका निवडणुकीचे गणित बदलणार?

मेळाव्यासाठी एकत्र आलेल्या उद्धव ठाकरेंनी आम्ही एकत्र राहणार असल्याचे सांगत आगामी महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहेत. राज ठाकरेंनी देखील एकत्रित राहू असे म्हटले आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होणार हे निश्चित मानले जात आहे.

Uday samant Raj Thackeray Eknath Shinde
Beed Parli politics : धनंजय मुंडेच्या परळीत जादूटोण्याचा प्रयोग? अजितदादाच्या पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याचा प्रताप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com