Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics: बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनीच ठाकरेंचे 15 आमदार फूटणार; शिंदेंच्या माजी आमदाराचा दावा

Rahul Shewale claims : अद्याप पक्ष फुटीचे ग्रहण संपलेले दिसत नाही. मोठ्या पक्षामधील खिंडार पडणे सुरु असताना वर्षांच्या पहिल्याच महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेनेचे माजी खासदाराने केला आहे.

Mangesh Mahale

Mumbai News 21 Jan 2025: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप एकनाथ शिंदे यांना संपवून उदय सामंत यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली असताना शिवसेनेच्या माजी खासदाराने केलेल्या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही वर्षांपूर्वी उभी फूट पडली, त्यानंतरही अद्याप पक्ष फुटीचे ग्रहण संपलेले दिसत नाही. मोठ्या पक्षामधील खिंडार पडणे सुरु असताना वर्षांच्या पहिल्याच महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.

काँग्रेसचे 10 आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे 23 जानेवारी रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. केंद्रातही मोठा राजकीय भूंकप होऊ शकतो, असेही शेवाळे म्हणाले.गेल्या कित्येक दिवसांपासून यासंबंधीच्या घडामोडी सुरू असल्याचे शेवाळे यांनी ठामपणे सांगितले.

येत्या 23 तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिन आहे. याच दिवशी ठाकरे गटातील 10 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शेवाळे यांनी केल्याने दोन दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडतील का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT