Mahendra Thorve  sarkarnama
मुंबई

Mahendra Thorve : बॉडीगार्डकडून भररस्त्यात कारचालकाला मारहाण, आमदार थोरवे म्हणाले,'ते दोघे...'

Mahendra Thorve bodyguard beaten car drive thackeray group : मारहाण झालेला आणि मारहाण करणारा हे दोघे आमचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्यात आपआपसांत वाद झाले आहेत, असेही थोरवे म्हणाले.

Roshan More

Mahendra Thorve News : कर्जत तालुक्यातील नेरूळ येथे भररस्त्यात एक व्यक्तीने कारचालकाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ ठाकरे गटाने ट्विट करत मारहाण करणारी व्यक्ती मुख्यमंत्री शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. मात्र माझ्या परिचयाची आहे. ज्याला मारहाण झाली आणि जो मारहाण करतोय ते दोघे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत.

ठाकरे गटाचा दावा खोडून काढताना महेंद्र थोरवे यांनी मारहाण करणारी व्यक्ती ही बॉडीगार्ड नसल्याचे निक्षून सांगितले. शिवाय मारहाण झालेला आणि मारहाण करणारा हे आमचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्यात आपआपसांत वाद झाले आहेत, असेही थोरवे म्हणाले.

साम टीव्ही'शी बोलताना आमदार थोरवे यांनी मारहाण करणाऱ्याला उद्देशून म्हटले की, त्यानी चुकीचे कृत्य केले असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

ठाकरे गटाचे ट्विट काय?

ठाकरे गटाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की, 'महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही... कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये! कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय!'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT