Kirit Somaiya : नाराज किरीट सोमय्या शेवटी मनातलं बोलले, 'बावनकुळे, फडणवीसांपेक्षा जास्त...'

Kirit Somaiya BJP Bawankule Devendra Fadnavis : किरीट सोमय्या म्हणाले, 'मी इतरांपेक्षा दहापट जास्त काम करत आहे. पदाची लालसा नाही. कुठल्याच समितीच शेपूट नको.'
Kirit Somaiya
Kirit Somaiyasarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya News : भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोग संपर्क प्रमुख नियुक्ती करत मोठी जबाबदारी देण्यात आली होती. मात्र ही जबाबदारी नाकारत सोमय्यांनी निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवेंसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर आज (बुधवारी) पुन्हा सोमय्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सोमय्या म्हणाले, 'मी इतरांपेक्षा दहापट जास्त काम करत आहे. पदाची लालसा नाही. कुठल्याच समितीच शेपूट नको.'

'मी कमिटीचा सदस्य कशाला? आत्ता कशाला? सामान्य कार्यकर्त्यांचे वजन हे बावनकुळे आणि फडणवीसांपेक्षा जास्त असते, हे किरीट सोमय्याने सिद्ध केले आहे.', असे देखील किरीट सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiya
Sharad Pawar Vs Bjp: सांगलीत मोठा राजकीय भूकंप; शरद पवार भाजपला धक्का देणार? माजी खासदाराने घेतली भेट

2019 ला अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी मला तेथून जायला सांगितले होते. तेव्हापासून मी सामन्या कार्यकर्ता म्हणून दहापट काम करतो आहे. वास्तविकरित्या मला कमिटीची गरज नाही. मी फिरतो आहे. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये काम करतो आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

सोमय्यांनी पत्रात काय म्हटले होते?

प्रिय रावसाहेब, आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाचीतरी नियुक्ती करावी. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अश्या प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो.

Kirit Somaiya
Firing case : 'वंचित'च्या पदाधिकाऱ्यावरील गोळीबाराला वेगळेच वळण, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com