corporation Abhishek Ghosalkar death firing Mauris Noronha  Sarkarnama
मुंबई

Abhishek Ghosalkar : मोठी बातमी! फेसबुक लाइव्हमध्ये गोळीबाराचा थरार, अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर यांना गोळीबारानंतर करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं

Akshay Sabale

Abhishek Ghosalkar Death : मुंबईत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याचं प्रकरण ताजे होते. अशातच मुंबईत आणखी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. माजी आमदार विनोद घोसाळकर ( Vinod Ghosalkar ) यांचे पुत्र आणि शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर ( Abhishek Ghosalkar ) यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार झाला आहे. मॉरिस नावाच्या व्यक्तीनं हा हल्ला केला. मॉरिसनं स्वत:वरही गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत घोसाळकर आणि मॉरिस दोघांचा मृत्यू झाला आहे. ( Abhishek Ghosalkar Firing Latest News )

गोळीबारापूर्वी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हाने फेसबुक लाइव्ह केलं होतं. त्यानंतर मॉरिस उठला आणि त्यानं अभिषेक यांच्यावर गोळीबार केला. यात अभिषेक यांना चार गोळ्या लागल्या होत्या, तर मॉरिसने स्वत:वर चार गोळ्या झाडून घेतल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या अभिषेक यांना बोरिवलीतील करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचारावेळी अभिषेक यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयानं दिली आहे. तसेच, मॉरिसचाही यात मृत्यू झाला आहे. करुणा रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि सहकारी रोहित पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत महेश यांच्यासह रोहित पाटील गंभीर जखमी झाले होते. सध्या महेश आणि रोहित यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उल्हासनगर न्यायालयानं गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT