Mumabi News, 05 August : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील निवडणुकीचा स्ट्राईक रेट पाहिला, तर शिंदे यांचा 'स्ट्राईक रेट' डबल आहे. शिवसेनेची मते फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाच शिवसैनिक खरी शिवसेना मानतो, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.
आंबेडकरांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. आंबेडकरांची प्रज्ञा हरवलेली असते म्हणूनचे ते राजकारणात 'वंचित' असतात, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे.
आंबेडकरांनी शिंदेंची शिवसेना (Shivsena) हीच खरी असल्याचं वक्तव्य केलं. यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले, "ते विद्वान आहेत पण त्यांची प्रज्ञा राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या हरवलेली असते म्हणूनच ते कायम राजकारणात 'वंचित' राहिले आहेत. दुसऱ्याच्या पायात खोडा घालणं, एवढंच त्यांचं काम आहे. स्वत: एकही जागा जिंकू शकत नाहीत, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आश्चर्य आहे, अशा शब्दात सावंत यांनी आंबेडकरांवर निशाणा साधला.
तसंच राज्याच्या विकासासाठी हातात हात घालून पुढं जाण्याचं आवाहन देखील सावंत यांनी यावेळी केलं. प्रकाश आंबेडकरांचे (Prakash Ambedkar) अजूनही डोळे उघडले तर त्यांना कळेल की, राज्याच्या विकासासाठी हातात देऊन पुढे जाणं, क्षणभर थोडं मागं राहणं, अट्टाहास न करणं, त्याग करणं आणि राज्याचा विकास करणं ही मूलभूत तत्वं त्यांनी स्वीकारली तर राज्याचं आणखी खूप भलं होईल, असा सल्लाही खासदार सावंत यांनी आंबेडकरांना दिला. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या या टीकेवर वंचितचे नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, "एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील निवडणुकीचा स्ट्राईक रेट पाहिला, तर शिंदे यांचा 'स्ट्राईक रेट' डबल आहे. याचा सरळ अर्थ असा की, शिवसेनेची मते फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. एकनाथ शिंदे यांनाच शिवसैनिक खरी शिवसेना मानतो.
ठाकरे यांचा स्ट्राईकरेट आरक्षणवादी आणि मुस्लिम मतदारांमुळे वाढला आहे. हे दोन्ही वर्ग धर्मवादी पक्षाचे मतदार नाहीत. ठाकरेंचा मतदार दूर गेलाय, हे काँग्रेस मांडत नाही. काँग्रेसला कणा असता, तर हे वास्तव मांडलं असतं. मात्र, काँग्रेसचा कुणीही नेता हे मांडायला तयार नाही."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.