Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shinde Vs Thakceray : ठरलं! शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याला ठाकरे गट देणार 'असं' प्रत्युत्तर ; लवकरच मोठी घोषणा

Maharashtra Politics : अयोध्या दौऱ्यावरुन विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर खरमरीत टीका...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मंत्रिमंडळ, खासदार, आमदारांसह प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. शिंदे हे अयोध्या दौऱ्याचं वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरले आहेत. अयोध्या दौऱ्यावरुन विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर खरमरीत टीका केली जात आहे.

याचवेळी ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला आता ठाकरे गट अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन प्रत्युत्तर देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या अवकाळी दौऱ्याची माहिती दिली आहे. हा दौरा विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि अमरावती भागात असण्याची शक्यता आहे. तसेच माजी मुख्यमंत्री व शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे देखील या दौऱ्यात सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दानवे म्हणाले, राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. तर अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde_, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री खासदार, आमदार हे अयोध्येला गेले आहेत. यामुळे अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावलेल्या बळीराजाकडे दु्र्लक्ष करुन मंत्री अयोध्येला गेले आहेत.

याचमुळे लवकरच ठाकरे गट राज्यभर दौरा करणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याचं काम सुरू असून त्यानंतर याबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचंही ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. लवकरच यासंबंधीची मोठी घोषणा करण्यात येणार आहे. सध्या अवकाळी पावसाने केलेली नुकसान पाहणी स्वतः सर्व शिवसैनिक आमदार आणि स्थानिक प्रतिनिधी करतील असंही अंबादास दानवे म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT