Eknath Shinde in Ayodhya: अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

अयोध्या आणि राममंदिर आमच्या भावना जोडल्या आहेत. आमची आस्था आहे
eknath Shinde
eknath Shindesarkarnama
Published on: 
Updated on: 

Eknath Shinde in Ayodhya Visit : अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जाणार असून त्याला 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' असं नाव दिलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जागेची मागणी केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच इथे मोठं महाराष्ट्रभवन उभारले जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

अयोध्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतल,त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्येत प्रभु रामाचं मंदिर व्हावं, जम्मू कश्मीर मधून ३७० कलम हटवलं जावं हे दिवंगत बाळासाहेबांच स्वप्न होतं. ते स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं.

eknath Shinde
Eknath Shinde Ayogya news: अयोध्या दौऱ्यावर टिका करणाऱ्या विरोधकांवर एकनाथ शिंदेंचा पलटवार; मी घरात बसून....

पण काही लोकांना हिंदूत्त्वाची अॅलर्जी आहे. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदूत्त्वाचे विचार शिकवले. पण इतर धर्माचे अपमान करणारे आमचे हिंदुत्त्व नाही. २०१४मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात देशात हिंदुत्त्वाचे सरकार स्थापन झाले. मोदींमुळे हिंदुत्त्वाचा जागर झाला. असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षावही केला.

आम्ही रामलल्लांच दर्शन घेतलं, इथे आल्यानंतर एक वेगळचं वलय जाणवत आहे. हजारो- लाखोच्या संख्येने लोक आमच्यासाठी इथे आले, त्यांनी केलेल्या स्वागतासाठी मी त्याचे आभार मानतो, अशा शब्दांत त्यांनी अयोध्येतील जनतेचे आभारही मानले. प्रभु रामाच्या चरणांनी पवित्र झालेली ही भुमी आहे. १४ वर्षे वनवास पुर्ण करुन राम अयोध्येला आले तो दिवस कसा असेल हा विचार करुनच अद्भुत वाटते. अयोध्येतील वातावरण राममय झालं, राममंदिर अस्मितेचा विषय आहे. अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.