Thackeray Vs Shinde  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; राऊत संतापले, ते स्वतःला 'हिंदुहृदयसम्राट' म्हणून घेतात ?

Thackeray Vs Shinde मी मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही, मी व्यक्तिश: एकनाथ शिंदे यांच्यावर बोलतोय...

Mangesh Mahale

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते, माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक झाल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

"गद्दारांनी स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणून घेणे हा वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही, मी व्यक्तिश: एकनाथ शिंदे यांच्यावर बोलतोय की, ते वीर सावरकर आणि बाळासाहेबांची पदवी स्वतःला लावून घेतात," असे म्हणत खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर टीका केली आहे.

दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडूप पोलिस ठाणे गाठले. शिंदे गटाविरुद्ध त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यावर जहरी टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राऊत म्हणाले, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी आणि त्यांचे सहकारी जे गद्दार हृदयसम्राट आहेत. ते स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेतात, त्यांच्यावर तमाम हिंदूंचा आक्षेप आहे, जनतेचा रोष आहे याच भावना दत्ता दळवींनी बोलून दाखवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत."

विक्रोळीतील राहत्या घरातून पोलिसांनी दळवी यांना ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. रविवारी (२७ नोव्हेंबर) शिवसेना उबाठा गटातर्फे भांडूपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांचा जाहीर मेळावा होता.

या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुहृदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी टीका केली होती. भाषणात त्यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दत्ता दळवी यांची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT