Thane : काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. याप्रकरणी भाजपने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. (BJP MLA Ganpat Gaikwad Fake Account)
एका कार्यक्रमातील त्याच्या व्हिडिओमध्ये फेरफार करुन आमदार गायकवाड यांची खिल्ली उठवली होती. या घटनेला पंधरा दिवस उलटत असताना त्यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट बनवून त्यावरुन महिलांना संदेश पाठविल्याचा प्रकार समोर येत आहे.
कोणीतरी आपल्या नावाचे बनावट अकाऊंट तयार करून महिलांना मेसेज करत असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत जिल्हा शहर पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.आमदार गायकवाड यांच्या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी पोलिसांनी ठाण्यातील एका ओला कारचालकाला अटक केली आहे.
रविवारी (०९ जुलै २०२३) दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंदन सुभाष शिर्सेकर (वय, २८) असे अटक करण्यात आलेल्या ओला कारचालकाचे नाव आहे.
ठाण्यातील कोसळेवाडी येथील तो रहिवासी आहे. आमदार गायकवाड यांच्या नावाने त्याने काही दिवसांपूर्वी बनावट फेसबूक अकाऊंट तयार केले. या फेक अकाऊंटच्या माध्यमातून चंदन महिलांना फ्रेन्ड रिक्वेस्ट आणि हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, तुम्ही भेटू शकतात का? असे मेसेज पाठवायचा. सुरुवात केली.
त्यापैकी एका महिलेने थेट आमदार गणपत गायकवाड यांना तुम्ही मला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली का? अशी विचारणा केली आणि हा संपूर्ण प्रकार उजेडात आला. त्याने अनेक महिलांना असे मेसेज पाठवले होते. त्यातील एका महिलने आमदार गायकवाड यांची भेट घेतली.
याबाबत त्या महिलेने "तुम्ही मला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली का? अशी विचारणा केल्यानंतर या प्रकार उघडकीस आला. काही दिवसांपूर्वी गायकवाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांच्या आवाजाऐवजी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज मॉर्फ करण्यात आला होता.
दोन वर्षापूर्वी गणपत गायकवाड यांचा लहान मुलगा प्रणव गायकवाड याची ३९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली होती. प्रणव गायकवाड याच्या कंपनीत काम करणाऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपर आशीषकुमार चौधरी याने ही फसवणूक केली असल्याचा आरोप आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.