NCP - ShivSena Sarkarnama
मुंबई

Loksabha Election : राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे आणि कल्याण सोडणार शिवसेनेला; पक्षाच्या बैठकीनंतर संकेत

Thane - Kalyan Lok Sabha Constituency: सध्या ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे, तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सध्या तीनही पक्षाकडून मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येत आहे. काही मतदारसंघ एकमेकांना सोडण्याची, तर काहींची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे आणि कल्याण हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसाठी (उद्धव बाळसाहेब ठाकरे) सोडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसे संकेतही दिले होते. तसेच, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. (Thane, Kalyan Lok Sabha Constituency NCP will leave to Shiv Sena)

कर्नाटक विधानसभेच्या निकालाने विरोधी पक्षांना बळ मिळाले आहे, तेव्हापासून विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडीकडून तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) गेल्या दोन दिवसांत मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेतल्या आहेत. त्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) लढविलेल्या आहेत, त्या त्यांना सोडाव्या लागतील. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनीही टोकाची भूमिका घेऊ नये, असे स्पष्ट केले होते.

त्यानंतर लोकसभा निवडणुकीत ठाणे, कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे गटासाठी सोडण्याची शक्यता आहे. सध्या ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे, तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आले आहेत. यातील खादार राजन विचारे ठाकरे गटात, तर श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत.

वास्तविक २०१९ च्या निवडणुकीत ठाण्यातून राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी राजन विचारे यांना टक्कर दिली होती. मात्र, त्यात परांजपे यांचा पराभव झाला होता. या मतदारसंघातून संजीव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर २००९ मध्ये विजय मिळविला होता. तसेच (स्व.) वसंतराव डावखरे यांनी २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांना घाम फोडला होता, त्यावेळी परांजपे हे अवघ्या २२ हजार मतांनी निवडून आले होते, त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये काँटे की टक्कर झालले आहे.

कल्याणमधून २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबाजी पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ते मैदानात उतरले होते. कल्याण मतदासंघ हा २००८ मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीत लढत होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून एकदा आनंद परांजपे, तर दोनदा श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळविला आहे. मात्र, वसंतराव डावखरे आणि प्रकाश परांजपे यांच्यात २००९ मध्ये काँटे की टक्कर झाली होती. त्यामुळे शिवसेनेने विजय मिळविलेल्या हे दोन्ही मतदासंघ राष्ट्रवादी शिवसेनेला सोडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT