Mahesh Gaikwad  Sarkarnama
मुंबई

Maharashtra latest news : '...तर तुझा बाबा सिद्दीकी करू', माजी नगरसेवकाला भर लग्नसमारंभात मिळाली धमकीची चिठ्ठी; जेलमधील भाजपच्या माजी आमदारावर संशय

Thane Kalyan Mahesh Gaikwad death threat suspicion pointing BJP former MLA Ganpat Gaikwad : ठाणे जिल्ह्यातील कल्याणचे महेश गायकवाड यांना चिठ्ठीद्वारे जीवे मारण्याची धमकी आली असून, त्यांनी भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड याच्यावर संशय व्यक्त केला.

Pradeep Pendhare

Kalyan crime news : कल्याणचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना भर लग्नसमारंभात चिठ्ठीद्वारे जीवे मारण्याची धमकी आली आहे. महेश गायकवाड यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचं नाव घेऊ नको, नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू, अशी ही धमकी असल्याचे महेश गायकवाड यांनी म्हटले आहे.

महेश गायकवाड यांनी याबाबत स्वतः माहिती दिली. ते म्हणाले, "आनंदनगर इथं एका लग्नसमारंभात सहभागी झालो होतो. त्यावेळी तिथे एका व्यक्तीने चिठ्ठी आणून दिली. त्यात मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांच्याबाबत काही बोलला, तर तुला बाबा सिद्दीकी (Baba Siddique) करू, म्हणजेच, मला गोळ्या झाडून मारण्याची धमकी दिली आहे".

'यासंदर्भात आपण शिवाजीनगर पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी यासंदर्भात लवकरात, लवकर चौकशी करून कारवाई करावी. ज्या लिफाफ्यातून ही चिठ्ठी आली आहे, ते जेलमधील आहे. सध्या भाजपचा माजी आमदार गणपत गायकवाड देखील जेलमध्ये आहे. त्यामुळे मला संशय आहे की, हे सर्व गणपत गायकवाड करत आहे', असा गंभीर आरोप महेश गायकवाड यांनी केला.

'गणपत गायकवाड जेलमध्ये आहे. परंतु त्याला हा पंधरा दिवस जेलमध्ये असतो, अन् पंधरा दिवस जेजे हाॅस्पिटलमध्ये असतो, म्हणजेच एकप्रकारे तो जेलमध्ये नसल्यासारखाच आहे. त्याच्यावर मोठ-मोठ्याला आका लोकांचा हात आहे. आशीर्वाद आहे. या प्रकरणात वैभव गायकवाड याला क्लिन चीट दिली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे', असेही महेश गायकवाड यांनी म्हटले आहे.

पोलिस ठाण्यात गोळीबार, काय आहे प्रकरण...

कल्याणमधील भाजप माजी आमदार गणपत गायकवाड आणि माजी नगरसेवक महेश गायकवाडमध्ये द्वारली इथल्या एका जागेच्या वाद आहे. हिललाईन पोलिस ठाण्यापर्यंत हा वाद गेला होता. त्यावेळी माजी आमदार गणपत गायकवाड याने माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. जवळपास सहा गोळ्या झाडल्या होत्या. यात महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार जखमी झाले होते. ही घटना 2 फेब्रुवारी 2024 रोजी घडली होती. या घटनेनंतर माजी आमदार गायकवाड याला अटक झालेली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत तळोजा जेलमध्ये आहे.

गणपत गायकवाडच्या अडचणी वाढल्या

गणपत गायकवाड हा भाजपचे माजी आमदार आहे. त्यामुळे सत्तेचा वापर करून तो लवकरच बाहेर येईल, अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. यातच माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे आणि त्यात त्यांनी संशयाची सुई माजी आमदार गणपत गायकवाड याच्याकडे केली आहे. त्यामुळे गणपत गायकवाड याच्या अडचणी वाढल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT