Aaditya Thackeray : पंतप्रधानांपेक्षा राऊत काकांसोबत दिल्लीत फिरायला बरं वाटतं : आदित्य ठाकरे

Shivsena Nirdhar Shibir : दिवाकर रावते यांनी आमच्या चार पिढ्यांसोबत काम केलं आहे. रावते साहेबांसोबत सभागृहात काम करण्याची संधी मिळाली. मी मंत्री असताना सभागृहात बोलताना एक जरी शब्द इकडे तिकडे झाला तरी त्यांचा फोन यायचा...
Sanjay Raut-Aaditya Thackeray
Sanjay Raut-Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 09 March : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निर्धार शिबिर आज मुंबईत पार पडत आहे. या शिबिरात बोलताना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माजी मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई यांचे कौतुक केले. तसेच, पंतप्रधानांसोबत फिरण्यापेक्षा राऊत काकांसोबत (संजय राऊत) दिल्लीत फिरायला बरं वाटतं... कारण राऊत काकांनी दिल्लीत जो वट बनवला आहे, तो बघण्यासारखा आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, ज्येष्ठ नेत्यांकडून ऐकल्यानंतर शिवसेनेचे शिबिर इथेच थांबायला पाहिजे. कारण, मास्टर क्लास झाल्यानंतर आपण काय बोलायचं? दिवाकर रावते साहेब यांनी आमच्या चार पिढ्यांसोबत काम केलं आहे. रावते साहेबांसोबत सभागृहात काम करण्याची संधी मिळाली. मी मंत्री असताना सभागृहात बोलताना एक जरी शब्द इकडे तिकडे झाला तरी त्यांचा फोन यायचा... रावते साहेब यांनी मराठवाड्यात काम केलं. मुंबईत राहणाऱ्या नेत्याने गरीब शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे.

माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा अनुभव मला हा दावोसला आला होता. प्राणायाम, व्यायाम दोन ते तीन तास करायचे. मग ते दिवसाच्या कामाला सुरुवात करायचे. उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना सुभाष देसाई यांनी पक्षात जबाबदारी घेतली. मला मंत्रिपद नको. दुसऱ्यांना आणि तरुणांना संधी द्या, अशी मागणी केली होती, अशी आठवणही ठाकरे यांनी सांगितली.

Sanjay Raut-Aaditya Thackeray
Suresh Dhas : धनंजय मुंडे यांच्याविरोधातील ‘हा’ आरोप सुरेश धसांनी थांबविला; कारणही आले पुढे...

ते म्हणाले, राजन विचारे यांना किती दबाव आणला जातोय, हे सर्वांनी सांगितलं. अनेक लोक आम्हाला येऊन दबाव आणला जात आहे, असे सांगतात. मग, राजन विचारे यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला. पण, उभे राहिले ते राजन विचारे.

लोकसभेत आपलं यश आपण मानतो. त्यानंतर पदवीधर आणि सिनेट निवडणुकाही आपण जिंकलो. विधानसभा निवडणुकीत यांनी वोटर फ्रॉड झाला, तो आपण समोर आणत आहोत... इथून पुढे मुंबई, ठाणे, नागपूरला जाऊन लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. या गद्दारांनी 2022 ला आपलं सरकार पाडलं... त्यावेळी त्यांनी सरकार बनवलं. आता त्यांचं सरकार आलंय, पण त्यांनाही विश्वास बसत नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Sanjay Raut-Aaditya Thackeray
Pankaja Munde Election Defeat : 'लोकसभा लढवण्याची इच्छा नव्हती'; पंकजा मुंडेंनी पराभवामागील खदखद सांगितली

ते म्हणाले, अजूनही जुने भाजपवाले आहेत, ते सांगतात की आपलं सरकार आलं कसं? जे वाजपेयी साहेबांच्या काळातील नेते सांगतात हे सरकार या नेत्यांना शॉक होतं की सरकार आलं कसं? आताचे भाजपवाले आहेत ते कॉन्ट्रॅक्टवाले भाजपवाले राहिले आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com