Exit Poll Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात मुबंईपासून अगदी मराठवाड्यातील धाराशिवपर्यंत ठाकरेंना लोळवण्यासाठी दंड फुगविलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्याच्या आखाड्यात हक्काचा माणूस म्हणजे, नरेश म्हस्केंना उतरविले. म्हस्केंना प्रचंड ताकद देऊन ठाकरेंच्या राजन विचारेंचे राजकारण संपविण्यासाठी शिंदे हे डावांवर डाव टाकत राहिले. मात्र, हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेही नेते ठाकरेंकडे नसल्याने ठाणे हमखास हातातून निसटण्याची भीती ठाकरेंच्या गोटात होती.
परंतु, जराही कॉन्फिडन्स कमी न होऊ देता, ठाकरे आणि विचारेही(Rajan Vichare) तेवढ्याच ताकदीने तेही जिंकण्यासाठी आखाड्यात राहिले. पण, काही करून ठाण्यावर ताबा ठेवण्याचा शिंदेंचा इरादा म्हस्केंमुळे फसण्याची चिन्हे आहेत. परिणामी, ठाण्यात ठाकरेंच्या मशालीची धग शिंदेंना चांगलीच जाणवण्याचा अंदाज पुढे आला आहे. 'टीव्ही 9 पोलस्ट्राट एक्झिट पोलमधून शिंदेना धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा शनिवारी पार पडला. आता सर्वांनाच 4 जून रोजीच्या निकालाची उत्सुकता आहे. तत्पुर्वी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दर्शवण्यास सुरुवात केली आहे.
टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, देशातील एकूण 543 जागांपैकी एनडीए आघाडीला 353-368, इंडिया आघाढी 118-133, इतर 43-48 जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. तर महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 तर अपक्ष एका जागेवर दिसत आहे. यामध्ये भाजप - 18, शिवसेना -04, राष्ट्रवादी - 00, काँग्रेस - 05, ठाकरे गट - 14, पवार गट - 06 जागा दिसत आहे. यावरून भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष दिसत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.