Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला चार दिवस बाकी असले तरी एक्झिट पोलमधून देशाचा मूड समोर आला आहे. सर्वच एक्झिट पोलने इंडिया आघाडीला धक्का दिला आहे. एक्झिट पोलनुसार एनडीएला 360 च्या जवळपास तर इंडिया आघाडीला 150 हून कमी जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एनडीचीची सत्ता राहणार अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
भाजपने निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. पण बहुतेक एक्झिट पोलने भाजपचा हिरमोड केला आहे. मागील निवडणुकीत भाजपला 303 तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या. यावेळी या आकड्यांमध्ये काहीशी वाढ होऊ शकते.
मात्र, भाजपला 400 चा आकडा गाठता येणार नाहीत. तर काँग्रेसला मागील निवडणुकीत 52 जागा मिळाल्या होत्या. यावेळी हा आकडा किंचित वाढू शकतो, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
देशात निवडणुकीआधी इंडिया भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीचा प्रयोग केला. ‘यूपीए’मध्ये असलेली बहुतेक पक्ष या आघाडीत आहेत. मतदारांनी या आघाडीला साफ नाकारले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा पुन्हा चालणार असल्याचे दिसते. काँग्रेस नेते राहुल गांधींसह मित्रपक्षाच्या नेत्यांनी केलेल्या दणकेबाज प्रचाराला मतदारांनी प्रतिसाद दिला नसल्याचे एक्झिट पोलमधील आकड्यांनुसार दिसते.
रिपब्लिक-मार्टिझ
एनडीए – ३५३ ते ३६८
इंडिया – ११८ ते १३३
इतर – ४३ ते ४८
जन की बात
एनडीए – ३६३ ते ३९२
इंडिया – १४१ ते १६१
इतर – १० ते २०
दैनिक भास्कर
एनडीए – २८१ ते ३५०
इंडिया – १४५ ते २०१
इतर – ३३ ते ४९
इंडिया न्यूज- डी डायनॅमिक्स
एनडीए – ३७१
इंडिया – १२५
इतर ४७
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.