eknath shinde sarkarnama
मुंबई

Thane Lok Sabha Election 2024 : ठाण्यात शिंदेंचा उमेदवार ठरला? जवळील आमदाराच्या व्हायरल पत्रानं खळबळ..!

Thane Lok Sabha Constituency : ठाणे लोकसभा मतदारसंघ राखण्यात मुख्यमंत्र्यांना यश ?

Pankaj Rodekar

Thane News : ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटासह भाजपने दावा केला असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या इच्छुकांच्या यादीतील उमेदवार असलेले आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्हायरल झालेल्या एका पत्राने चांगलीच खळबळ उडाली आहे. हा मतदारसंघ राखण्यात शिवसेना शिंदे गटाला यश आल्याचे दिसत आहे.

या मतदारसंघाचे उमेदवार हे आमदार प्रताप सरनाईक हेच असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा वाढलेला तिढा सुटला असेच म्हणावे लागणार आहे. त्यातच सरनाईकांना ही वाढदिवसाचे गिफ्ट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी केलेले भाकीत तंतोतंत खरे असल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच भाजपने आपला दावा करत इच्छुकांची यादीही पुढे केली होती. मात्र, शिवसेना शिंदे गटाने हा मतदारसंघ आपला असल्याने त्यांनीही जागा सोडण्यास नकार दिला. त्यांनीही इच्छुकांची यादी जाहीर करत, उमेदवारांची चाचपणी सुरू केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, ठाकरे गटाने उमेदवाराच्या नावाची घोषणा ही केली. तरीसुद्धा महायुतीकडून उमेदवाराचे घोषित न करता, प्रचाराला सुरुवात केली. दोन्ही पक्षांकडून प्रचार सुरू ठेवल्याने या जागेचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. शिवसेनेकडून धनुष्यबाण तर भाजपकडून कमळ याच चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी आग्रह होताना दिसत आहे, तर मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ठाण्यात आल्यावर ते उमेदवाराची घोषणा करतील असे भाजप कार्यकर्त्यांना वाटले होते. मात्र, त्यांनी उमेदवार किंवा हा मतदारसंघ कोणाला जाईल, याबाबत काही जाहीर न करता तो तिढा कायम ठेवला. त्यातच आमदार संजय केळकर यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास लढण्यास तयार असल्याचे जाहीर केले.

येत्या 20 एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरू होणार आहे. 20 मे रोजी निवडणूक होणार आहे. तरीसुद्धा उमेदवार जाहीर न केल्याने हा तिढा वाढल्याची चर्चा रंगत असताना, आमदार सरनाईक यांचे लेटरहेड असलेले एक पत्र व्हायरल झाले आहे. त्यामध्ये सरनाईकांनी आगामी लोकसभा (Lok Sabha) निवडणूक 2024 च्या उमेदवारीकरिता अर्ज दाखल करणार आहेत. माझ्या विरुद्ध वसई-विरार, मीरा-भाईंदर कार्यक्षेत्रात गुन्हे दाखल आहेत का ? त्याबाबत माहिती मिळणे आवश्यक आहे. तरी माझ्याविरुद्धच्या दाखल गुन्ह्यांची माहिती देण्याची कृपा करावी, असे पत्र सरनाईकांनी वसई विरार, मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना दिले आहे. यावरूनच सरनाईकांना उमेदवारी जाहीर झाली असेच म्हणावे लागेल. याशिवाय हा मतदारसंघ राखण्यात शिंदे गटाला यश आले असेही दिसत आहे.

Edited By : Chaitanya Machale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT