Thane Lok Sabha Election Sarkarnama
मुंबई

Thane Lok Sabha Election: ठाण्यात 13 महिला खासदारकीच्या शर्यतीत; एकच नाव असलेल्या दोन जोड्या

Pankaj Rodekar

Thane Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात होणाऱ्या ठाणे जिल्ह्यामधील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची संख्या 79 ही निश्चित झाली आहे. यामध्ये निव्वल 45 उमेदवार हे अपक्ष आहेत. विशेष म्हणजे या तीन मतदारसंघात 13 महिला खासदार होण्यासाठी सरसावल्या आहेत. त्यामध्ये काही प्रमुख पार्टीच्या तर काही अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत.

भिवंडीत (Bhivadi Loksabha Election) सर्वाधिक सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय ठाणे लोकसभा मतदारसंघात माघार घेणारे संभाजी जाधव हे कल्याणचे सुभेदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर, चंद्रकांत मोटे (Chandrakant Mote) हे कल्याण आणि भिवंडीतून एकाच वेळी निवडणूक लढवत आहे. तसेच जिल्ह्यात पाटील आणि म्हात्रे यांच्याबरोबर अन्सारी आडनाव असणारी मंडळीही कल्याण आणि भिवंडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत.

ठाणे जिल्ह्यातील (Thane loksabha Constituncy) ठाणे, कल्याण आणि भिवंडी या मतदारसंघात (Bhiwandi Constituency) अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यात 01, कल्याण 02 आणि भिवंडीतून 09 असे डझन भर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात 79 जण निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. सर्वाधिक उमेदवार हे 28 उमेदवार कल्याण मतदारसंघात असून त्या खालोखाल भिवंडी आणि ठाण्यात आहेत.

तर छोट्या मोठ्या पक्षांच्या बरोबरीने 45 अपक्ष उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. विशेष 79 उमेदवारांमध्ये 13 महिला उमेदवारांचा समावेश आहे. ठाण्यात 02, कल्याणात 05 आणि भिवंडीत 06 महिला उमेदवार असून यामध्ये 07 अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. इतर सहा जणी या पक्षांच्या उमेदवार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेना उबाठा, बहुजन समाज पार्टी, बहुजन महा पार्टी, बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी या पक्षाच्या महिला उमेदवारांचा समावेश आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशा आहेत महिला ब्रिगेड ...

वैशाली दरेकर-राणे, सलिमा मुक्तार वसानी ,अर्चना ‍दिनकर गायकवाड, पूनम जगन्नाथ बैसाणे, सुशीला काशिनाथ कांबळे, अश्विनी अमोल केंद्रे, प्राजक्ता निलेश येलवे, मुमताज अन्सारी, कांचन वाखारे, मनीषा गोंधळे , रंजना त्रिभुवन ,तारा पिंट्या वाघे, सोनाली गंगावणे.

भिवंडीत एकाच नाव आणि आडनावाच्या दोन जोड्या...

जिल्ह्यातील भिवंडी मतदारसंघात खऱ्या भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे व अपक्ष उमेदवार निलेश सांबरे अशी रंगतदार लढत होईल असेच दिसत आहे. मात्र या मतदारसंघात नेहमीप्रमाणे यंदाही एकच नाव आणि आडनाव असलेले उमेदवार आमनेसामने आले आहेत. यामध्ये कपिल मोरेश्वर पाटील आणि कपिल जयहिंद पाटील तर सुरेश गोपीनाथ म्हात्रे आणि सुरेश सीताराम म्हात्रे अशा दोन जोड्या मतदारांना गोंधळात टाकणार आहेत.

संभाजी जाधवांचे होणार का कल्याण..!

ठाणे लोकसभा मतदारसंघातून एकमेव अर्ज मागे घेण्यात आला. तेच संभाजी जाधव हे कल्याणच्या सुभेदारीसाठी सज्ज झाले आहेत. ते संयुक्त भारत पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर कल्याण आणि भिवंडी अशा दोन मतदारसंघातून एकाच वेळी अपक्ष म्हणून चंद्रकांत मोटे हे उभे राहिले आहेत. याशिवाय अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले हे देखील कल्याणमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. ठाण्यात शिवसेनेचे दोन्ही गट अस्तित्वासाठी भिडणार; बाण चालणार की मशाल पेटणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT