Maharashtra Lok Sabha 2024 Voting Live Updates : कोल्हापूरात सर्वाधिक मतदान, तर बारामतीत सर्वात कमी, जाणून घ्या टक्केवारी

Lok Sabha Election 2024 Voting Live Updates : दिवसभरातील निवडणुकीच्या ताज्या घडामोडी, महत्वाचे अपडेट्स, देशासह राज्यातील राजकीय घटना, मतदानाचे अपडेट्स घडामोडी जाणून घ्या...
rahul gandhi narendra modi
rahul gandhi narendra modisarkarnama

Maharashtra Election Voting LIVE Updates : महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत सर्वाधिक कमी मतदान बारामतीत...

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी कोल्हापुरात सर्वाधिक 64 टक्के तर बारामतीमध्ये 46 टक्के मतदान झाले.

Maharashtra Election Voting LIVE Updates : महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत सर्वाधिक कमी मतदान बारामतीत...

 • लातूर - 55.38%

 • सांगली - 52.56%

 • बारामती - 45.68%

 • हातकणंगले - 62.18%

 • कोल्हापूर - 63.71%

 • माढा - 50.00%

 • धाराशीव - 52.78%

 • रायगड - 50.31%

 • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 53.75%

 • सातारा - 54.11%

 • सोलापूर - 49.17%

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : देशात 5 वाजेपर्यंत 60.19 टक्के मतदान

 • आसाम - 74.86%

 • बिहार - 56.01%

 • छत्तीसगड - 66.87%

 • दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 65.23%

 • गोवा - 72.52%

 • गुजरात - 55.22%

 • कर्नाटक - 66.05%

 • मध्य प्रदेश - 62.28%

 • महाराष्ट्र - 53.40%

 • उत्तर प्रदेश - 55.13%

 • पश्चिम बंगाल - 73.93%

Pune Voting Updates LIVE : ईव्हीएम मशीनची पुजा केल्याप्रकरणी रूपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

ईव्हीएम मशीनची पुजा केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

rupali chakankar
rupali chakankarsarkarnama

Solapur Voting Updates LIVE : सांगोल्यात EVM जाळलेल्या ठिकाणी पुन्हा मतदान होणार? जिल्हाधिकारी म्हणाले...

सांगोल्यात जाळण्यात आलेल्या मशीनच्या बदल्यात नवीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बसविण्यात आले. संबंधित मतदान केंद्रावर शांतता असून सुरळीत मतदान सुरू आहे. जे मशीन जळाले आहेत, त्यावरील मतदान मोजता येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मतदान घेण्याची कोणतीही गरज नाही, अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE : बारामती अन् माढ्यात दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वांत कमी मतदान

 • लातूर - 44.48%

 • सांगली - 41.30%

 • बारामती - 34.96%

 • हातकणंगले - 49.94%

 • कोल्हापूर - 51.51%

 • माढा - 39.11%

 • धाराशीव - 40.92%

 • रायगड - 41.43%

 • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 44.73%

 • सातारा - 43.83%

 • सोलापूर - 39.54%

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : देशात दुपारी 3 वाजेपर्यंत 50.71 टक्के मतदान, महाराष्ट्र पिछाडीवरच...

 • आसाम - 63.08%

 • बिहार - 46.69%

 • छत्तीसगड - 58.19%

 • दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 52.43%

 • गोवा - 61.39%

 • गुजरात - 47.03%

 • कर्नाटक - 54.20%

 • मध्य प्रदेश - 54.09%

 • महाराष्ट्र - 42.63%

 • उत्तर प्रदेश - 46.78%

 • पश्चिम बंगाल - 63.11%

Solapur Lok Sabha Election 2024 LIVE : सुशीलकुमार शिंदे यांनी कुटुंबासह केलं मतदान

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्नी सौ. उज्वलाताई आणि कन्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह सहकुटुंब मतदान केले.

Hatkanagale Voting News LIVE :  हातकणंगले मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 36.17 टक्के मतदान झाले आहे.

हातकणंगले- 278 – 39.65 टक्के

इचलकरंजी 279 – 33.77 टक्के

इस्लामपूर- 283- 37.20 टक्के

शाहूवाडी- 277- 35.48 टक्के

शिराळा- 284- 34.98 टक्के

शिरोळ – 280- 35.71 टक्के

Kolhapur Voting Updates LIVE : कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 38.42 टक्के मतदान झाले आहे.

चंदगड- 271- 37.15 टक्के

कागल- 273- 40.03 टक्के

करवीर -275- 42.12 टक्के

कोल्हापूर उत्तर 276- 37.85 टक्के

कोल्हापूर दक्षिण 274- 35.46 टक्के

राधानगरी- 272- 38.18 टक्के

Baramati Voting News LIVE : दुपारी एक पर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील 27.55% टक्के मतदान 

दौंड : 26 %

इंदापूर : 25.1 %

बारामती : 32.11 %

पुरंदर : 24.05 %

भोर : 33.41 %

खडकवासला : 25.1 %

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates : मतदानात महाराष्ट्राची गाडी सर्वात मागेच

 • आसाम - 45.88%

 • बिहार - 36.69%

 • छत्तीसगड - 46.14%

 • दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 39.94%

 • गोवा - 49.04%

 • गुजरात - 37.83%

 • कर्नाटक - 41.59%

 • मध्य प्रदेश - 44.67%

 • महाराष्ट्र - 31.55%

 • उत्तर प्रदेश - 38.12%

 • पश्चिम बंगाल - 49.27%

Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates : एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

 • लातूर - 32.71%

 • सांगली - 29.65%

 • बारामती - 27.55%

 • हातकणंगले - 36.17%

 • कोल्हापूर - 38.42%

 • माढा - 26.61%

 • धाराशीव - 30.54%

 • रायगड - 31.34%

 • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 33.91%

 • सातारा - 32.78%

 • सोलापूर - 29.32%

Hatkanagale Voting Updates LIVE : हातकणंगलेत धैर्यशील माने अन् सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते भिडले

हातकणंगले मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर यांचे कार्यकर्ते भिडले आहेत. यावेळी दोन गटात जोरदार हाणामारी सुद्धा झाली आहे. साखरावे गावातील बूथ क्रमांक 62,63 येथे हा प्रकार घडला आहे.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं मतदान

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर गोव्यातील कोथंबी येथील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.

Madha Lok Sabha Election 2024 Voting LIVE : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी पत्नीसह केलं मतदान

निंभोरे ता. फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या जिजामाला नाईक निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

rajjitisngha naik nimbalkar
rajjitisngha naik nimbalkarsarkarnama

Baramati Lok Sabha Election 2024 Voting LIVE : भोरमध्ये पैसे वाटल्याची राष्ट्रवादीकडून तक्रार, आयोगानं केली मोठी कारवाई

बारामती लोकसभा मतदारसंघात भोर विधानसभा मतदारसंघामध्ये विरोधकांकडून पैसे वाटपाची तक्रार ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत निवडणूक आयोगाने भरारी पथकांमार्फत केलेल्या तपासणीत वाहनांमध्ये रोख रक्कम, घड्याळ चिन्हाचे प्रचारपत्रक, भोर विधानसभा क्षेत्रातील गावांची यादी, मतदारांची यादी इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात मतदारांना लाच देणे किंवा अमिष दाखविणेबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार हे मात्र नक्की!

Hatkanagale Lok Sabha Election 2024 LIVE : जयंत पाटलांनी कुटुंबासह वाळव्यात केलं मतदान

राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले चिरंजीव प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील आणि सून यांच्यासोबत वाळवा तालुक्यातील साखराळे येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे

jayant patil
jayant patilsarkarnama

Baramati Voting LIVE Updates : इंदापुरात दत्तात्रय भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांला शिवीगाळ

इंदापूर तालुक्यात अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा बूथवर परिसरार गोंधळ. भरणेवाडी येथे शरद पवार गटाचा कार्यकर्ता नाना गवळी याला शिवीगाळ करत दमबाजी केली. याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे. तर सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Hatkanagale Lok Sabha Election 2024 Voting LIVE : धैर्यशील माने यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला

dhairyasheel mane
dhairyasheel manesarkarnama

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 33 टक्के मतदान

 • आसाम - 27.34%

 • बिहार - 24.41%

 • छत्तीसगड - 29.90%

 • दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 24.69%

 • गोवा - 30.94%

 • गुजरात - 24.35%

 • कर्नाटक - 24.48%

 • मध्य प्रदेश - 30.21%

 • महाराष्ट्र - 18.18%

 • उत्तर प्रदेश - 26.12%

 • पश्चिम बंगाल - 32.82%

Dharashiv Lok Sabha Election 2024 LIVE : तानाजी सावंत यांनी मुगाव येथे केलं मतदान

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मुगाव (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे मतदान केले.

tanaji sawant
tanaji sawantsarkarnama

Baramati Lok Sabha Election 2024 LIVE : 11 वाजेपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का

दौंड - 12 %

इंदापूर - 14.48 %

बारामती - 14.64 %

पुरंदर - 14.08 %

भोर - 13.08 %

खडकवासला - 14 %

Satara Lok Sabha Election 2024 Voting LIVE : जनता इंडिया आघाडीला साथ देईल, देशात सत्तांतर होणार; पृथ्वीराज चव्हाण

लोकशाहीचा उत्सव दर पाच वर्षांनी साजरा होतो. त्यावर एक गडद छाया यावेळी आहे. या देशात लोकशाही अस्तित्वात राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल थांबवण्यासाठी आज देशात देशातील जनता सज्ज झालेली आहे. मला खात्री आहे की जनता इंडिया आघाडीला साथ देऊन देशात सत्तांतर होईल याची मला खात्री आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates :   महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान, बारामतीत किती?

लातूर - 20.74%

सांगली - 16.61%

बारामती - 14.64%

हातकणंगले - 20.74%

कोल्हापूर - 23.77%

माढा - 15.11%

धाराशीव - 17.06%

रायगड - 17.18%

रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 21.19%

सातारा - 18.94%

सोलापूर - 15.69%

Sangli Voting LIVE : विश्वजीत कदम यांनी कुटुंबासह कडेगाव येथे बजावला मतदानाचा हक्क

माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम आणि स्वप्नाली कदम यांनी आपल्या मतदानाचा हक्क सोनसळ तालुका कडेगांव येथे बजावला .

vishwajeet kadam
vishwajeet kadamsarkarnama

Lok Sabha Election 2024 LIVE : राणारणजितसिंह पाटील कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील, अशी लढत होत आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील, आमदार राणजगजितसिंह पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मतदान केले.

ranajagjitsinha patil
ranajagjitsinha patilsarkarnama

Baramati Voting News LIVE : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी दाखल

बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे, अशी लढत आहे. मुळात ही लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच होत आहे. त्यातच सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडीतील घरी दाखल झाल्या होत्या. पण, पाच मिनिटांमध्ये त्या घरातून बाहेर पडल्या आहे. आशा काकींची भेट घेण्यासाठी आले होते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Pune Voting Updates LIVE : दौंड तालुक्यातील मतदान केंद्रावर ईव्हीएममशीनमध्ये बिघाड

कुसेगाव (ता.दौंड) येथे ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने सव्वा तास अधिक वेळ मतदान केंद्र बंद आहे. 31 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असताना सव्वा सातच्या सुमारास मशीन बंद पडले आहे. जेष्ठ नागरिक व महिलांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. सव्वा नऊच्या दरम्यान मतदान केंद्र सुरळीत झाले आहे. सव्वा तास अधिक मतदान प्रक्रिया बंद असल्याने महिला व नागरिक त्रास सहन करावा लागला आहे.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election 2024 : मला यश प्राप्त करून द्यावे, अशी देवाजवळ प्रार्थना, नारायण राणे

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे. मला यश प्राप्त करून द्यावे, अशी देवाजवळ प्रार्थना! मी नेहमीच पेपरला बसतो, त्यावेळी अभ्यास करून बसतो. मी हुशार विद्यार्थी आहे. जे अभ्यास करीत नाहीत, त्यांना पेपर कठीण जातो. मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळींना विनंती करेन की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे. आज मतदान आहे, मोदींनी घोषणा केली आहे की, अब की बार ४०० पार. आमचे ४०० खासदार निवडून येणार. त्यामध्ये आपल्या कोकणचा, हक्काचा आणि तुम्ही अनेक वर्षे प्रेम दिले, त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी या सर्वांनी मतदान करावे अशी विनंती नारायण राणे यांनी केली.

narayan rane
narayan ranesarkarnama

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates : धाराशिवमध्ये ओमराजेंनी केलं मतदान

धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.

omraje nimbalkar
omraje nimbalkarsarkarnama

Lok Sabha Election 2024 LIVE : पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

 • आसाम - 10.12%

 • बिहार - 10.41%

 • छत्तीसगड - 13.24%

 • दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 10.13%

 • गोवा - 13.02%

 • गुजरात - 9.87%

 • कर्नाटक - 9.45%

 • मध्य प्रदेश - 14.43%

 • महाराष्ट्र - 6.64%

 • उत्तर प्रदेश - 12.94%

 • पश्चिम बंगाल - 15.85%

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : राम सातपुते यांनी माळशिरसमध्ये सहकुटुंब केलं मतदान

माळशिरसचे आमदार व सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आज माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

Kolhapur Voting LIVE :  हातकणंगले लोकसभा सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत मतदारसंघात 7.55% मतदान

 • हातकणंगले विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 8.50% मतदान

 • इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात 7.91% मतदान

 • इस्लामपूर विधानसभा क्षेत्रात 7.76% मतदान

 • शाहुवाडी विधानसभा क्षेत्रात 6.21% मतदान..

 • शिराळा विधानसभा क्षेत्रात 6.60% मतदान..

 • तर शिरोळ विधानसभा क्षेत्रात 8.20% मतदान

 • सकाळच्या सत्रात हातकणंगले क्षेत्रात सर्वाधिक मतदान तर शाहुवाडी मध्ये कमी मतदानाचा टक्का

Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting LIVE : माढ्यात सर्वात कमी, तर रत्नागिरी अन् सिंधुदुर्गंमध्ये सर्वाधिक मतदान

 • लातूर - 7.91%

 • सांगली - 5.81%

 • बारामती - 5.77%

 • हातकणंगले - 7.55%

 • कोल्हापूर - 8.04%

 • माढा - 4.99%

 • धाराशीव - 5.79%

 • रायगड - 6.84%

 • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 8.17%

 • सातारा - 7.00%

 • सोलापूर - 5.92%

Kolhapur Voting News : धनंजय महाडिक यांनी बजावला मतदानाचा हक्क

खासदार धनंजय महाडिक यांनी शाहू मार्केट येथे जाऊन कुटुंबासमवेत मतदान केले आहे. "गेले दीड ते दोन वर्ष आम्ही ज्या गोष्टीसाठी कष्ट करत होतो तो आजचा दिवस आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांनी चंग बांधलेला आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही महायुतीचे दोन्ही मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. हे दोन्ही मतदार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि भाजपचा 'आपकी बार' '400 पार' हा नारा यशस्वी होईल. 4 जूनला पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची घोषणा होईलच. यात कोल्हापूरचे दोन्ही खासदार असतील, कोल्हापूर मतदारसंघात तीन तालुक्यात मताधिक्य देण्याची चढाओढ लागली आहे. भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे," अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली.

dhananjay mahadik
dhananjay mahadiksarkarnama

Baramati Voting LIVE : बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी केलं मतदान

बारामतीत हायव्होल्टेज लढत होत आहे. यातच शरद पवार यांनी माळेगाव्यात मतदानाचा हक्क बजावला आहे. तर, सुप्रिया सुळे यांनी रिमांड होम मैदान मतदान केलं आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिनं पहिल्यांदाच मतदान केलं आहे.

Madha Voting News LIVE : मी जनतेतील उमेदवार, लादला गेलेला नाही; धैर्यशील मोहिते-पाटलांचा निंबाळकरांना टोला

माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. माढ्यातील जनता मला निवडून देईल, मी जनतेमधील उमेदवार असून लादला गेलेला उमेदवार नाही, असे म्हणत निंबाळकरांना टोला लगावला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे माढ्यातील जनता मला या निवडणुकीमध्ये निवडून देईल."

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : गृहमंत्री अमित शाहांनी पत्नीसह गांधीनगरमध्ये मतदानाचा हक्क

गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगरमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्याविरोधात सोनल पटेल यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

Baramati Voting Updates LIVE : शरद पवारांनी माळेगावात बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी माळेगावातील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूल येथील मतदारसंघावर मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्यासह उमेदवार सुप्रिया सुळे, रेवती सुळे यासुद्धा उपस्थित होत्या.

Indapur Voting News LIVE : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सह कुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा या मूळ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व कन्या अंकिता पाटील ठाकरे, पत्नी भाग्यश्री पाटील, पुत्र राजवर्धन पाटील यानी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

harshvardhan patil
harshvardhan patil sarkarnama

Sangli Voting LIVE : सांगलीध्ये तीन ठिकाणी उशिरानं मतदान

सांगली मतदारसंघातील 348 मतदान केंद्रातील तीन मतदान यंत्रे बंद पडली होती. ती सुरू करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 News LIVE : माळशिरसमध्ये सत्ताधाऱ्यांकडून बनावट नोटांचे वाटप

सत्ताधाऱ्यांनी माळशिरस तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचे वाटप केलं आहे. पण, हे पैसे बनावट असल्याचा मोठा आरोप धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी केला आहे.

Hatkanagale Voting LIVE : हातकणंगलेतील ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरूडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क सरूड प्राथमिक विद्यालय केंद्रावर जाऊन सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास केले मतदान आज मतदारसंघातील विविध केंद्रावर भेट देणार आहेत

satyajeet patil sarudkar voting
satyajeet patil sarudkar votingsarkarnama

Latur Lok Sabha Election 2024 Voting LIVE : रितेश-जेनेलिया देशमुख यांनी लातूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क

लातूरमध्ये अभिनेता रितेश देशमुख, पत्नी जेनेलिया देशमुख आणि देशमुख कुटुंबीय यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates : सोलापुरात व्हीव्हीपॅट मशिनमधध्ये बिघाड

दक्षिण सोलापुरातील गंगेवाडी येथील मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे 15 ते 20 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया थांबली आहे.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : राहुल कुल यांनी पत्नीसह दौंडमधील राहू येथे बजावला मतदानाचा हक्क  

दौंडमधील राहू येथील मतदान केंद्रावर आमदार राहुल कुल यांनी पत्नी कांचन कुल यांच्यासह सकाळी सात वाजताच मतदानाचा हक्क बजावला

Maharashtra Election Voting LIVE Updates : हातकणंगलेत राजू शेट्टी अन् सांगलीत विशाल पाटीलांनी केलं मतदान

हातकणंगलेतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी आणि सांगलीतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

raju shetti
raju shettisarkarnama

Maharashtra Election Voting LIVE Updates : पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा हक्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी उपस्थितांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.

Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE : आदिती तटकरेंनी केलं मतदान

मंत्री आदिती तटकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Lok Sabha Election 2024 Voting Updates : कोल्हापूर शाहू महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापुरात श्रीमंत शाहू महाराज, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांनी मतदान केलं आहे.

shrimant shahu maharaj
shrimant shahu maharajsarkarnama

Lok Sabha Election 2024 News LIVE : सोलापुरात प्रणिती शिंदे अन् राम सातपुते यांनी केलं मतदान

प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात मतदान केलं आहे. तर राम सातपुते यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.

Lok Sabha Election 2024 News LIVE : अजित पवार यांनी काटेवाडीत केलं मतदान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला आहे. बारामतीत भावकीची निवडणूक नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

Lok Sabha Election 2024 LIVE : अमित देशमुख आणि उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क

लातूरमध्ये आमदार अमित देशमुख यांनी पत्नीसह मतदान केलं आहे. त्यासह साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates : पंतप्रधान मोदी यांनी केलं आवाहन

देशात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं जनतेनं बाहेर पडून मतदान करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE updates in Marathi : देशात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशात 93 तर राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यात 11 आणि केंद्रशाशित प्रदेशांचा समावेश होणार आहे. सूरतची जागा भाजपनं जिंकली असून गुजरातमधील 25 जागांवर मतदान होईल. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर; कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड; मराठवाड्यात धाराशिव, लातूर या मतदारसंघात मतदान होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.