Rajan Vichare  Sarkarnama
मुंबई

Rajan Vichare : 'निष्ठावंत विरुद्ध गद्दार'; राजन विचारेंनी शिंदे गटाला डिवचलं

Pankaj Rodekar

Thane loksabha Election : ठाण्यात निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई होणार आहे. ठाणेकर, नवी मुंबईकर असेल या मीरा-भाईंदरकर या ठिकाणी मला साथ देतीलच. परंतु विरोधकांना अद्यापही उमेदवार मिळत नसेल तर मला वाटतंय त्यांनी मला बिनविरोध निवडणूक द्यावे, असे मत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार राजन विचारे यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचे काम केले.Maha Vikas Aghadi candidate MP Rajan Vikhare

गुरुवारी 28 मार्च रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील अश्वारूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विचारे यांनी प्रचाराच्या कामाला सुरुवात केली. या वेळी त्यांच्यासोबत इंडिया आघाडीतील काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई(Suhas Desai) आदी उपस्थित होते. Candidate MP Mahavikas Aghadi

याचदरम्यान, एकीकडे ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) ठाणे लोकसभेचा उमेदवाराची घोषणा केली तरीसुद्धा दुसरीकडे शिंदे गटाला अद्यापही उमेदवारी मिळत नाही. त्यामुळे विचारे यांनी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना डिवचण्याची संधी सोडली नाही. विचारे यांनी आज हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आज या पवित्र दिवशी या ठिकाणी इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते छत्रपती महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत.

जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला हिंदवी स्वराज निर्माण केलं, त्यावेळेस सर्व जाती-धर्माच्या लोकांना बारा बलुतेदार 18 बगड जाती त्याच बरोबर सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्याच पद्धतीने आज या महाराष्ट्रामध्ये चांगले स्वराज्य निर्माण करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल, असे आवाहन केले.

दुसरीकडे विचारे या देशांमध्ये ज्या पद्धतीने सर्व पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. तसेच भ्रष्टाचारी लोकांना त्या ठिकाणी जवळ करण्याचे काम केले जात आहे. या सर्व गोष्टींचा सबंध लक्षात घेता, ही जनतासुद्धा त्यांना कंटाळलेली आहे, अशी टीका भाजप सरकारवर विचारे यांनी केली. ठाण्यामध्ये निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई होणार आहे. (Rajan Vichare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT