Loksabha Election 2024 : शिंदे गटाच्या खासदारांची भाजपने कापली तिकिटे! शिवसेनेत नाराजीचा सूर...

Udhav Thackeray लोकसभेतील विद्यमान खासदार मोठ्या विश्वासाने ठाकरेंची साथ सोडून युतीत सहभागी झाल्यानंतर ऐनवेळी अशी वागणूक मिळत असल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजी पसरली आहे
Devendra Fadanvis, Eknath Shinde
Devendra Fadanvis, Eknath Shindesarkarnama

Mumbai Shivsena News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अद्याप काही जागांवर तिढा कायम आहे. दोन ते तीन जागांवरून महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे सांगितलं जात आहे, तर काही जागांवर चक्क महायुतीतील शिंदे गटाच्या खासदारांचे तिकीट कापून आयात उमेदवाराला तिकीट देण्यात आलं. भाजपकडून शिंदे गटातील अनेक मतदारसंघ स्वत:कडे खेचल्याने शिंदे गटामध्ये अंतर्गत नाराजीचा सूर पसरला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून निगेटिव्ह सर्व्हे पुढे करून शिवसेनेच्या जागा अप्रत्यक्ष स्वत:कडे घेत आहेत. या माध्यमातून पक्षातील नेत्यांच खच्चीकरण होत असल्याची चर्चा पक्षातील नेत्यांमध्ये सुरू आहे. लोकसभेतील विद्यमान खासदार मोठ्या विश्वासाने ठाकरेंची साथ सोडून युतीत सहभागी झाल्यानंतर ऐनवेळी अशी वागणूक मिळत असल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजी पसरली आहे.

महायुतीतील चर्चेला फक्त एकनाथ शिंदे Eknath Shinde गटाकडून फक्त मुख्यमंत्र्यांनाच बोलावलं जातं, तर राष्ट्रवादीतून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित असतात. भाजपबाबत होत असलेल्या जागेच्या वाटाघाटीत पक्षातील नेत्यांना दूर ठेवत असल्याने पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे.

Devendra Fadanvis, Eknath Shinde
Eknath Shinde and Vijay Shivtare : एकनाथ शिंदे पाठवणार शिवतारेंना नोटीस, भूमिकेवर ठाम राहिल्यास पक्षातून हकालपट्टी?

लोकसभा निवडणुकीत अशी परिस्थिती आहे, तर विधानसभा निवडणुकीला काय होणार, भविष्याच्या चिंतेने शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ज्या कारणामुळे ठाकरेंची साथ सोडली, त्याच्या उलट कृती होत असल्याने आमदारांमध्ये चिंता पसरली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने बळकावले शिवसेनेचे मतदारसंघ...

अमरावती - नवनीत राणांचा पक्ष प्रवेश देऊन उमेदवारी

रत्नागिरी- सिंधुदुर्ग - नारायण राणेंना उमेदवारी

छत्रपती संभाजीनगर - भागवत कराड यांच्या नावाची चर्चा

दक्षिण मुंबई - राहुल नार्वेकर

उत्तर पश्चिम -भाजपचा दावा

पालघर - राजेंद्र गावित यांना कमळ चिन्हावर लढवण्याचा आग्रह

नाशिक - हेमंत गोडसेंच्या जागेवर भाजपचा दावा

Edited By : Umesh Bambare

R

Devendra Fadanvis, Eknath Shinde
Ambadas Danve On BJP : भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंचवीस टक्के दुसऱ्या पक्षातून आलेले.. दानवेंचा टोला..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com