Thane Municipal Corporation  Sarkarnama
मुंबई

Thane Municipal Election : ठाणे महापालिकेत मोठी उलथापालथ! आरक्षण सोडतीने अनेक दिग्गजांचा 'हिरमोड'; कोणाचे नशीब फळफळले?

Thane Politics Local Body Elections: ठाणे महापालिकेचे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणानसुसार तब्बल 66 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Thane Municipal News : ठाणे महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत अनेक प्रभागांचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच राहिल्याने काहींना दिलासा मिळाला, तर काही इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसले.

या आरक्षण सोडतीत १३१ पैकी ६६ जागा महिलांसाठी आणि ६५ जागा पुरुषांसाठी राखीव ठरल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत महिलांचा प्रभाव वाढणार असल्याचे स्पष्ट दिसते.

राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वाजता सोडत पार पडली. महापालिकेच्या टेंभी नाका शाळा क्रमांक ७ मधील आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनीपियू गौर आणि अवंशीता प्रजापती यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.

सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्याने कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवला नाही. ठाणे पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

महिलांचे वर्चस्व

या आरक्षणात अनुसूचित जाती (महिला) ५, अनुसूचित जमाती (महिला) २, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) १८ आणि सर्वसाधारण महिला ४१ — अशा मिळून ६६ महिला नगरसेविका ठाणेकरांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तर पुरुषांसाठी ६५ जागा निश्चित झाल्या आहेत.

प्रवर्गनिहाय जागा

प्रवर्ग महिला पुरुष एकुण

अनुसूचित जाती ५ ४ ९

अनुसूचित जमाती २ १ ३

मागास प्रवर्ग १८ १७ ३५

सर्वसाधारण ४१ ४३ ८४

एकूण ६६ ६५ १३१

महापालिकेचे एकूण प्रभाग: ३३

४ सदस्यीय प्रभाग: ३२

३ सदस्यीय प्रभाग: १

एकूण सदस्य: १३१

महायुतीचा नारा

आरक्षण सोडतीच्या वेळी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला उपस्थित होते.

यावेळी “महायुती”चा नारा देत सर्वांनी एकत्रितपणे लढण्याचा संदेश दिला.

लोकसंख्या तपशील

अनुसूचित जाती: 1,26,003

अनुसूचित जमाती: 42,698

एकूण लोकसंख्या: 18,41,488

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT