Eknath Shinde Sanjay Kelkar sarkarnama
मुंबई

Thane Politics : ठाण्यात भाजपचा स्वबळाचा नारा? आमदार केळकर म्हणाले, 'महापौर आमचाच...'

Sanjay Kelkar BJP : आगामी महापालिका निवडणुकीत ठाण्यात युती होणार की नाही याची चर्चा सुरू असताना आमदार संजय केळकर यांनी महापौर भाजपचा व्हावा, अशी कार्यकर्त्यांशी इच्छा असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Thane Politics News : दिवाळीनंतर स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचा बार उडणार आहे. महापालिका निवडणूक डिसेंबर-जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यातच या निवडणुकीमध्ये महायुती होणारी की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही. त्यातच ठाण्यात भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर व्हावा, ही ठाणेकर कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने भाजपने ठाण्यात स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे.

ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांची आमदार संजय केळकर यांनी शहरातील उद्यानांच्या देखभालीच्या प्रश्नावर भेट घेतली. या वेळी आमदार निरंजन डावखरेही उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ठाणे महापालिकेत भाजपचाच महापौर व्हावा. राज्यात सत्ता असताना देखील आम्ही स्थानिक पातळीवर परिस्थितीनुसार स्वतंत्र लढलो आहोत आणि पुढेही ताकदीच्या ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आम्ही निवडणुकीच्या तोंडावर नव्हे, तर नेहमीच जनतेसाठी आवाज उठवतो, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चाचा उल्लेख करत त्यांनी टोला लगावला. तसेच महापालिकेत अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आणि करण्यासाठी पैशांची देवाणघेवाण होत असल्याच्या तक्रारी आहेत. न्यायालयाने ताशेरे ओढल्यावर कारवाई केली जाते; मात्र अनधिकृत काम सुरू होताच ती थांबवणे गरजेचे असल्याचे देखील केळकर यांनी व्यक्त केले.

जनता ठरवेल महापौर कोणाचा

खासदार नरेश म्हस्के यांनी केळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रत्येक पक्षाला वाटतं की महापौर आपला असावा, असं त्यांनाही वाटलं असेल त्यांची मागणी त्यांच्या दृष्टीने रास्त आहे. उद्या आरपीआय, समाजवादी पार्टीने जरी निवडणूक लढल्या तरी तेच म्हणणार की महापौर आमचा बसला पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने ते योग्य आहे. राजकारणात आम्ही आहोत, आम्हालाही वाटत आमचाच महापौर बसणार. आमचे म्हणणे की आमचाच महापौर बसणार जनता ठरवेल महापौर कोणाचा बसणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT