
वैभववाडी पंचायत समितीमध्ये नव्या आरक्षण पद्धतीमुळे इतर मागास प्रवर्गाची एक जागा कमी झाली आहे.
निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
कुडाळ तालुक्यातील पावशी पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाला आहे.
वैभववाडी/कुडाळ : जुन्या आरक्षण पद्धतीला पूर्णविराम देत नव्या पद्धतीने केलेल्या आरक्षणामुळे वैभववाडी इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला असून कुडाळ तालुक्यातील पावशी पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाला आहे. येथे 18 पैकी 13 गण खुले झाल्याने उलथापालथ होणार आहे.
वैभववाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आखलेल्या नव्या निकषाचा इतर मागास प्रवर्गालाही फटका बसला. त्यांची एक जागा कमी झाली आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी दिसून येत असून खांबाळे, लोरे, भुईबावडा हे प्रभाग सर्वसाधारण आरक्षित झाले आहेत. तर कोळपे, उंबर्डे हे दोन प्रभाग सर्वसाधारण महिला आणि कोकिसरे प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेकरीता आरक्षित झाले आहेत. या आरक्षणामुळे निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी केलेल्या इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे.
वैभववाडी पंचायत समितीच्या सहा प्रभागांची आज आरक्षण सोडत झाली. यावेळी नव्या निकषानुसार तालुक्यात अनुसुचित जाती, जमातीसाठी एकही जागा आरक्षित करता येणार नाही, तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकच जागा आरक्षित करता येणार असल्याचे स्पष्ट झाले. सहा प्रभागामधून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी कोकिसरे प्रभाग आरक्षित झाला. तर महिला की पुरूष याची सोडत काढली असता महिलेकरीता हा प्रभाग आरक्षित झाला.
त्यानंतर उर्वरित पाच प्रभागांमधून सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षण काढले असता कोळपे आणि उंबर्डे हे दोन प्रभाग महिलांकरीता आरक्षित झाले. उर्वरित खांबाळे, लोरे आणि भुईबावडा हे तीन प्रभाग सर्वसाधारण राहिले. तालुक्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी यापुर्वी दोन प्रभाग होते. मात्र, यावेळी एकच प्रभाग झाल्यामुळे त्या प्रवर्गातील इच्छुकांकडून नाराजी व्यक्त केली. लोरे, खांबाळे आणि भुईबावडा प्रभागात आता इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. जिल्हा परिषद आरक्षणाने अनेक मात्तबरांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. लोरे जिल्हा परिषद मतदारसंघ पुन्हा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाला आहे.
त्यामुळे या मतदारसंघाच्या विद्यमान सदस्य पल्लवी झिमाळ यांना निवडणुक लढविण्यास संधी आहे. कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तालुक्यातील एकमेव कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागणार आहे.
जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले अनेक मातब्बरांची निराशा झाली आहे. त्यामुळे हे इच्छुक आता पंचायत समितीकडे वळण्याची शक्यता आहे. पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण असल्याने काही जण निर्णय घेण्याची शक्यता आहे.
कुडाळ पंचायत समिती 13 गण खुले
दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत आज काढण्यात आली. ज्यात पावशी पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाला असून 18 पैकी 13 गण खुले झाले आहेत. अनुसूचित जमातीची लोकसंख्या पुरेशी नसल्याने त्याचे आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे सुरुवातीला पावशी प्रभागापासून सुरुवात केली. सर्वांत जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या पावशीमध्ये असल्याने आणि गेल्यावेळी सर्वसाधारण अनुसूचित जाती आरक्षण असल्याने यावेळी पावशीला अनुसूचित महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि महिलेसाठी आरक्षण काढले असता ते आंब्रड, डिगस नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोठोस आणि घावनळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण आहे. उरलेल्या तेरा गणासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जांभवडे, कसाल, ओरोस बुद्रुक, तेंडोली, साळगाव, माणगाव, झाराप यांच्यासाठी सर्वसाधारण तर आवळेगाव, वेताळबांबर्डे, नेरूर देऊळवाडा उत्तर, नेरूर देऊळवाडा दक्षिण, पाट, पिंगुळीसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे.
प्र.१: वैभववाडी पंचायत समितीमध्ये कोणता बदल करण्यात आला आहे?
👉 नवीन आरक्षण पद्धतीनुसार इतर मागास प्रवर्गाची एक जागा कमी करण्यात आली आहे.
प्र.२: या निर्णयाचा परिणाम कोणावर झाला आहे?
👉 निवडणुकीसाठी तयारी केलेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
प्र.३: कुडाळ तालुक्यातील कोणता गण आरक्षित करण्यात आला आहे?
👉 पावशी पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाला आहे.
प्र.४: नवीन आरक्षण पद्धती का चर्चेत आली आहे?
👉 कारण या पद्धतीमुळे अनेक पारंपरिक आरक्षण गटांचे समीकरण बदलले आहे.
प्र.५: वैभववाडी आणि कुडाळ तालुक्यातील राजकीय परिणाम काय असू शकतात?
👉 महिला उमेदवार आणि नव्या प्रवर्गांमुळे स्थानिक राजकारणात नवे चेहरे उदयास येतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.