Shiv Sena Leader Pradeep Purnekar Murder: Sarkarnama
मुंबई

Shiv Sena: ठाण्यात शिवसेना नेत्याची हत्या, ऑफिसमध्ये घुसून गोळ्या झाडल्या; दोन हल्लेखोर CCTVमध्ये कैद

Shiv Sena Leader Pradeep Purnekar Murder: ठाण्यात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. दोन संशयित हल्लेखोर CCTVमध्ये कैद, पोलिसांकडून शोध सुरू.

Mangesh Mahale

Thane Crime News: ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री मनोरमानगर परिसरात पुर्णेकर यांच्यावर त्यांच्या कार्यालयातच गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या हत्येच्या तपासात महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. घटनेपूर्वी दोन संशयित दुचाकीवरून पुर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जात असल्याचे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दोघांनी चेहऱ्यावर रुमाल बांधल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. या दृश्यांच्या आधारे पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुर्णेकर यांच्यावर दोनपेक्षा अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या लागल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी जीव गमावला. या घटनेनंतर मनोरमानगरसह ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमही दाखल झाली असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

पुर्णेकर यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अलीकडील राजकीय आणि सामाजिक हालचालींचीही माहिती घेतली जात आहे. मानपाडा आझादनगर आणि गणेश नगर भागातील नागरिकांच्या एका विषयासाठी ते आंदोलन करणार होते. मात्र, या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नव्हती. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती.

आता या आंदोलनाचा विषय आणि पुर्णेकर यांच्यावर झालेला हल्ला यांचा काही संबंध आहे का, यासह हत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. CCTV फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT